एक्स्प्लोर
कोल्हापुरात दहावीच्या विद्यार्थ्यांना नेणारी सुमो उलटून अपघात
चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्यालगत 15 ते 20 फूट खाली पलटी घेत कोसळली.
![कोल्हापुरात दहावीच्या विद्यार्थ्यांना नेणारी सुमो उलटून अपघात Kolhapur : Sumo car overturns, 10 students injured in accident latest update कोल्हापुरात दहावीच्या विद्यार्थ्यांना नेणारी सुमो उलटून अपघात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/22181038/Sumo-Kolhapur-accident.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : दहावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या सुमो कारला कोल्हापुरात अपघात झाला. अपघातात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून 10 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील माणगांव जवळ ही घटना घडली.
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी सुमो कारमध्ये दंगा-मस्ती करत प्रवास करत होते. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती रस्त्यालगत 15 ते 20 फूट खाली पलटी घेत कोसळली.
अपघातानंतर कोल्हापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातामध्ये दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून 10 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींवर ग्रामीण रुग्णलयात उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)