पंचगंगा नदीनं गाठली धोक्याची पातळी, 81 बंधारे पाण्याखाली, कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद
कोल्हापुरात (Kolhapur) मुसळधार पाऊस सुरुय. पंचगंगा नदीनं (Panchganga river) धोक्याची पातळी गाठलीय. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत.
Kolhapur Rain News : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात (Kolhapur) देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं (Panchganga river) धोक्याची पातळी गाठली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटावर पोहोचली आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.
राधानगरी धरण 100 टक्के भरलं, पाण्याचा विसर्ग सुरु
कोल्हापुरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं राधानगरी धरण 100 टक्के भरलं आहे. कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. एका स्वयंचलित दरवाजा मधून सुमारे 1400 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत
राज्याच्या अनेक भागात पावासाचा हाहाकार दिसून येत आहे. हवामान विभागाकडून पुढील 24 तासांंमध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. तर पुण्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळं पुण्यातील शाळा आज (25 जुलै) रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले आहेत. नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे.तर सिंहगड परिसरामध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने आहे. मुठा नदीला पूर आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे.
आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज ठाणे पालघरसह कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! उजनी धरण आज प्लसमध्ये येणार, मोठ्या प्रमाणात धरणात विसर्ग सुरु, सध्या पाणीसाठी किती?