![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kolhapur: मी 96 कुळी मराठा, पाटील आहे...कुणाला घाबरत नाही, जे करायचं ते उघड करतो; सतेज पाटलांचे प्रकाश आवाडे यांना प्रत्युत्तर
Kolhapur: जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तुम्ही आमचा कार्यक्रम केला, आम्ही सुद्धा वेळ येईल तेव्हा बघू असं आमदार प्रकाश आवाडे म्हणाले होते.
![Kolhapur: मी 96 कुळी मराठा, पाटील आहे...कुणाला घाबरत नाही, जे करायचं ते उघड करतो; सतेज पाटलांचे प्रकाश आवाडे यांना प्रत्युत्तर Kolhapur news minister satej patil slams bjp mla prakash awade DCC bank election Kolhapur: मी 96 कुळी मराठा, पाटील आहे...कुणाला घाबरत नाही, जे करायचं ते उघड करतो; सतेज पाटलांचे प्रकाश आवाडे यांना प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/08/4d87a031bae5096316776ebd91628b38_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊन दोन महिने झाले असले तरी या निवडणुकीनंतर सुरू झालेलं राजकारण अजूनही थांबलेलं नाही. सत्ताधारी आघाडीतील उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांना जिल्हा बँकेतील आपला पराभव चांगलाच जिव्हारी लागलाय. दोन दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील तारदाळ येथे विकास सेवा सोसायटीच्या उद्घाटन समारंभात पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्यासमोर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्याला सतेज पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार प्रकाश आवाडे काय म्हणाले?
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तुम्ही आमचा कार्यक्रम केला, आम्ही सुद्धा वेळ येईल तेव्हा बघू असं म्हणत एक प्रकारे आमदार प्रकाश आवाडे यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना डिवचलं. इतकंच नाही तर विकास कामाचे उद्घाटन आणि इचलकरंजी परिसरात वाढलेली गुन्हेगारी यावरूनही त्यांनी सतेज पाटील यांना लक्ष्य केलं.
मी 96 कुळी मराठा आहे, पाटील आहे...कुणाला घाबरत नाही: सतेज पाटील
आमदार प्रकाश आवाडे यांच्या या वक्तव्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील याच कार्यक्रमात त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मी 96 कुळी मराठा आहे, शत्रुत्व पत्करलं तर ते उघडपणे पत्करतो. कुणाला घाबरत नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 'आमचं ठरलंय' म्हणत मी उघड भूमिका घेतली होती हे जिल्ह्याला ठाऊक आहे असं सांगत सतेज पाटलांनी आमदार प्रकाश आवाडे यांना प्रत्युत्तर दिलंय.
एकेकाळी एकाच पक्षात असलेल्या सतेज पाटील आणि प्रकाश आवाडे यांच्यामध्ये रंगलेला हा कलगीतुरा जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय बनलाय.
संबंधित बातम्या :
- Aniket Jadhav in AFC U-23 Asian Cup : कोल्हापूरचा अनिकेत जाधव भारतीय संघात, आशियाई स्पर्धेत मैदानात उतरणार
- Kolhapur District Bank Election Result : 'गुलाल आमचाच!' कोल्हापूर जिल्हा बँकेवर 'विकास आघाडी'चं वर्चस्व; दिग्गजांसह विद्यमान संचालक पराभूत
- Kolhapur: 6 मार्चचा तो ऐतिहासिक दिवस; खासबागेत रंगली पावणेतीन तासांची कुस्ती आणि घुटना डावाने दिलेली मात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)