एक्स्प्लोर

कोल्हापूरात पावसाचा हाहाकार! पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shind) यांनी कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतलीय.

Kolhapur News मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shind) यांनी कोल्हापूरचे  जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतलीय. दरम्यान आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बचावकार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या आहेत. 

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

गेल्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. या मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर जिल्ह्याला बसला असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच काल धरणक्षेत्रात झालेला पाऊस लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार प्रशासनाने सतर्क आणि ऑन फील्ड राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री हे निती आयोगाच्या बैठकीसाठी सध्या दिल्ली येथे आहेत. बैठकीला जाण्यापूर्वी तेथूनच त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करुन पूरपरिस्थिती, पावसाची सद्यस्थिती आणि मदत व बचावकार्यासंदर्भात माहिती घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रशासनाला सूचना

लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये सर्व सुविधा पुरवणे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. जिल्ह्यामध्ये एनडीआरएफची दोन पथके तसेच भारतीय सेनेचे पथकही मदतीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवावे. धरणांमधून होणारा विसर्ग लक्षात घेवून अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्कात राहून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lamborghini : मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होताBeed Santosh Deshmukh Family : आज बाबा असते तर.. हत्येला 1 महिना उलटला; लेकीची भावूक प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lamborghini : मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
मंत्रालयात लेम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण?
AUS vs SL: श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियानं निवडला नवा कॅप्टन,स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करणार, पॅट कमिन्सची माघार, आक्रमक ट्रॅविस हेडकडे देखील मोठी जबाबदारी 
McDonald in Baramati: रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
रोहित आणि युगेंद्र पवारांच्या लाडक्या बहिणीचं नवं पाऊल, बारामतीत McDonald चं ग्रँड ओपनिंग!
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, पण अजितदादा अन् फडणवीसांमध्ये हिंमत नाही, कारण...; संजय राऊतांचा जोरदार प्रहार
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू; गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे दरवाजे बंद, अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना
Delhi Election: उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
उद्धव ठाकरेंचा हात केजरीवालांमागेच! दिल्ली निवडणुकांमध्ये इंडिया आघाडी बिघडली? अनिल देसाई म्हणाले..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो' , शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही कौतुक केलं ..
Santosh Deshmukh Case : भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...;  धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो, ताईच्या लग्नाचं प्लॅनिंग, पण काळाने असा घाला घातला की...; धनंजय देशमुखांनी पाणावल्या डोळ्यांनी सांगितल्या आठवणी
Embed widget