एक्स्प्लोर
Advertisement
...म्हणून महावितरणनं कोल्हापूर महापालिकेची वीज तोडली!
पंचगंगा नदीचं प्रदूषण न रोखणाऱ्या कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चांगलाच दणका दिला आहे.
कोल्हापूर : पंचगंगा नदीचं प्रदूषण न रोखणाऱ्या कोल्हापूर महापालिकेला प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चांगलाच दणका दिला आहे. प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या आदेशाने आज महावितरणने कोल्हापूर महापालिकेची वीज तोडून कारवाई केली. या कारवाईमुळे महापालिकेच्या भोंगळ कारभारही समोर आला आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेच्या हद्दीतील सर्व सांडपाणी हे प्रक्रिया न करताच थेट पंचगंगेत सोडण्यात येतं. यामुळं पंचगंगेचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदूषणाचा फटका पर्यायाने कोल्हापूरच्या नागरिकांना बसतो. यापूर्वी पंचगंगा नदी प्रदूषण मुद्यावरुन हरित लवाद आणि उच्च न्यायालयाने महापालिकेवर बरेच ताशेरे ओढले होते. तरीही महापालिकेला पंचगंगेचं प्रदूषण रोखता आलेलं नाही.
परिणामी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महावितरणला कोल्हापूर महापालिकेची वीज तोडण्याचे आदेश दिले होते. आदेश देऊनही महावितरणकडून पालिकेवर कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे याबाबत शिवसेनेनं महावितरणच्या अधिकऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर महावितरणकडून महापालिकेवर कारवाई करत त्यांची वीज तासाभराकरिता तोडली.
आगामी काळात महापालिकेने पंचगंगेचं प्रदूषण न रोखल्यास विद्युत पुरवठा कायमस्वरूपी तोडण्यात येईलं असंही प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई करताना म्हटलं आहे. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पंचगंगा प्रदूषण मुद्यावरून वीज तोडण्याचा प्रकार घडला आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना अनेक वेळा रस्त्यावर उतरल्या आहेत. पंचगंगेच्या प्रदूषणामुळं अनेक जणांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement