एक्स्प्लोर

Video : कोल्हापूरच्या रणरागिणीने केलं मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य, मंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य करणारी पहिली महिला कॉन्स्टेबल

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil) यांच्या गाडीचे सारथ्य महिला कॉन्स्टेबलने केले. 

सिंधुदुर्ग : व्हीआयपी गाडीचे ड्रायव्हिंग पुरुषांनी केलेले आपण नेहमी पाहत आलो आहे. मात्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात (Sindhudurg) एका रणरागिणीने तिन्ही मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केले. हे सारथ्य करणाऱ्या महिला कॉन्स्टेबलचे नाव तृप्ती मुळीक (Trupti Mulik ) असून त्या मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यातील अंबप पाडळी येथील आहेत. मात्र सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस दलामध्ये आपली सेवा बजावत आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) , उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील ( Satej Patil) यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला कॉन्स्टेबलने केले आहे. 

तृप्ती मुळीक गेल्या दहा वर्षापासून पोलीस दलामध्ये कार्यरत असून लहानपणापासूनच त्यांना ड्रायव्हिंगची आवड आहे. त्यामुळे त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंग कोर्समध्ये भाग घेतला. 23 डिसेंबर 2019 रोजी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण करून आज पहिल्यांदाच नवी जबाबदारी पार पाडली.

नारी शक्ती!
गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस विभागाच्या माध्यमातून त्या सेवा देत आहेत. पण, लहानपणापासून ड्रायव्हिंगची आवड असल्याने त्या सध्या सिंधुदुर्ग मोटार पोलीस परिवहन विभागामध्ये कार्यरत आहेत. 23 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला असून आज त्यांच्या या नव्या जबाबदारीचा पहिलाच दिवस होता. त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य वाख्याण्याजोगे असून राज्यातील तरुणींना प्रेरणा देणारे आहे. या प्रसंगामुळे माझ्या मनात माझ्या पोलीस विभागाबद्दलचा अभिमान अधिकच वाढला, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा अशा भावना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विविध ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम होते. मंत्र्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या होत्या. पोलीस ज्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र सगळ्यात नजरेस पडेल असे एक दृष्य  म्हणजे या तिन्ही मंत्र्यांचे सारथ्य एक महिला कॉन्स्टेबल करत होती. 

राज्यात आतापर्यंत महिला कॉन्स्टेबलने उपमुख्यमंत्री असेल किंवा मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य केल्याचे आपण पाहिले नाही. मात्र आज दिवसभर सिंधुदुर्गात मंत्र्यांचे सारथ्य करणाऱ्या तृप्ती मुळीक यांची जोरदार चर्चा झाली. व्हीआयपी ड्रायव्हिंग करण्याचा आजचा पहिला दिवस असला तरी तृप्ती यांनी कोणतीही भीती मनात न बाळगता आपली जबाबदारी बिनधास्तपणे पार पाडली.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग महिला पोलिसाच्या हाती! पाहा व्हिडिओ...

महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahadevi elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर
महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर
हुकूमशाही, सनातनी विचाराचा साखळदंड फक्त शिक्षणानेच मोडू शकतो, दुसरं काहीच घेऊ नका, फक्त शिक्षण घ्या; जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज बाबा चर्चेत असतानाच कमल हसन यांच्या विधानाने लक्ष वेधलं
हुकूमशाही, सनातनी विचाराचा साखळदंड फक्त शिक्षणानेच मोडू शकतो, दुसरं काहीच घेऊ नका, फक्त शिक्षण घ्या; जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज बाबा चर्चेत असतानाच कमल हसन यांच्या विधानाने लक्ष वेधलं
Former Jharkhand Chief Minister Shibu Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, लढवय्या चेहरा काळाच्या पडद्याआड
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, लढवय्या चेहरा काळाच्या पडद्याआड
इकडं अंकित गेला कावड यात्रेसाठी गेला अन् तिकडं चार महिन्यांपूर्वीच लग्न केलेली बायको जुन्या आशिकसोबत पळाली; निम्या वाटेतून परत आला, धक्का सहन न झाल्यानं...
इकडं अंकित गेला कावड यात्रेसाठी गेला अन् तिकडं चार महिन्यांपूर्वीच लग्न केलेली बायको जुन्या आशिकसोबत पळाली; निम्या वाटेतून परत आला, धक्का सहन न झाल्यानं...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadevi elephant Kolhapur: महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर
महादेवी हत्तीणीबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना वनताराचे अधिकृत उत्तर
हुकूमशाही, सनातनी विचाराचा साखळदंड फक्त शिक्षणानेच मोडू शकतो, दुसरं काहीच घेऊ नका, फक्त शिक्षण घ्या; जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज बाबा चर्चेत असतानाच कमल हसन यांच्या विधानाने लक्ष वेधलं
हुकूमशाही, सनातनी विचाराचा साखळदंड फक्त शिक्षणानेच मोडू शकतो, दुसरं काहीच घेऊ नका, फक्त शिक्षण घ्या; जितेंद्र आव्हाड, पृथ्वीराज बाबा चर्चेत असतानाच कमल हसन यांच्या विधानाने लक्ष वेधलं
Former Jharkhand Chief Minister Shibu Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, लढवय्या चेहरा काळाच्या पडद्याआड
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; दिल्लीत घेतला अखेरचा श्वास, लढवय्या चेहरा काळाच्या पडद्याआड
इकडं अंकित गेला कावड यात्रेसाठी गेला अन् तिकडं चार महिन्यांपूर्वीच लग्न केलेली बायको जुन्या आशिकसोबत पळाली; निम्या वाटेतून परत आला, धक्का सहन न झाल्यानं...
इकडं अंकित गेला कावड यात्रेसाठी गेला अन् तिकडं चार महिन्यांपूर्वीच लग्न केलेली बायको जुन्या आशिकसोबत पळाली; निम्या वाटेतून परत आला, धक्का सहन न झाल्यानं...
ठाकरे बंधुमुळे भाजप अलर्ट मोडवर; मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमधील आढावा घेतला जाणार, आशिष शेलारांनी बोलावली बैठक
ठाकरे बंधुमुळे भाजप अलर्ट मोडवर; मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमधील आढावा घेतला जाणार, आशिष शेलारांनी बोलावली बैठक
केदारनाथमध्ये बेपत्ता झालेल्या 'त्या' 3075 जणांचा अजूनही थांगपत्ता नाही, मृत 702 जणांच्या प्रियजनांचा अजूनही शोध; पुन्हा सांगाडे शोधले जाणार, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
केदारनाथमध्ये बेपत्ता झालेल्या 'त्या' 3075 जणांचा अजूनही थांगपत्ता नाही, मृत 702 जणांच्या प्रियजनांचा अजूनही शोध; पुन्हा सांगाडे शोधले जाणार, प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Prakash Ambedkar on Pune Dalit Girls: पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, प्रकाश आंबेडकरांनी एक फोन फिरवला अन् निर्वाणीचा इशारा दिला
पुण्यात दलित मुलींच्या छळाची तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ, प्रकाश आंबेडकरांनी एक फोन फिरवला अन् निर्वाणीचा इशारा दिला
Rare Blood Group : बेंगळुरूमधील महिलेमध्ये आढळला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट; CRIB म्हणेज नेमकं काय? वाचा सविस्तर
बेंगळुरूमधील महिलेमध्ये आढळला जगातील सर्वात दुर्मिळ रक्तगट; CRIB म्हणेज नेमकं काय? वाचा सविस्तर
Embed widget