एक्स्प्लोर
कोल्हापुरात पुरात अडकलेल्या अडीचशे प्रवाशांची सुटका
कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी बसमधल्या जवळपास अडीचशे प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अजूनही कोकणातून कोल्हापूरकडे येणारा रस्ता बंद आहे.
कोल्हापूर: कोल्हापुरातल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 खासगी बसमधल्या जवळपास अडीचशे प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अजूनही कोकणातून कोल्हापूरकडे येणारा रस्ता बंद आहे.
मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गगनबावडा मार्गावर कळे गावाजवळ पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात जवळपास अडीचशे प्रवासी अडकले होते, मात्र आता यातल्या चार बस प्रवाशांसहीत गगनबावडावरुन राधानगरी फोंडा- मार्गे बाहेर काढण्यात आल्या आहेत. तर 1 बस मात्र तिथंच रुतून बसली आहे, पण प्रवाशांची सुटका झाली आहे.
कोल्हापूर आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याला तर नद्यांचं रुप आलं आहे. त्यामुळे कोल्हापुरातून गगनबावडा मार्गे कोकणात जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
काल रात्री 1 वाजल्यापासून जवळपास अडीचशे प्रवासी अडकले होते. त्यांची सुटका करण्यात आली आहे.
या पाचही बस गोव्यातून गगनबावडा मार्गे पुण्याला जाता होत्या. मात्र रस्त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं या प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यामुळं हे प्रवाशी आता मदतीच्या प्रतीक्षेत होते.
नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात पाणी
कोल्हापुरातल्या मुसळधार पावसामुळं काल नृसिंहवाडीतल्या दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरलं. त्यामुऴं वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा काल दुपारी चारच्या सुमारास पार पडला.
सध्या कन्यागत पर्वकाळ सुरू असल्यानं आणि त्यातच काल द्वादशी योगाची पर्वणी साधत भाविकांनी दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला.
नृसिंहवाडीत दत्तात्रेयांच्या पादुका असलेल्या मुख्य मंदिरात पुराचे पाणी गेल्यानंतर दक्षिणद्वार सोहळा होतो. मंदिराच्या उत्तरेकडील दरवाजातून पुराचे पाणी मंदिरात जाते आणि पादुकावरून वाहते. त्यानंतर ते पाणी दक्षिण दरवाजातून बाहेर पडते म्हणून त्याला दक्षिणद्वार सोहळा म्हणतात.
पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
पाणी अर्थात जीवन. मात्र हेच पाणी जेव्हा आक्राळविक्राळ रुप धारणं करतं तेव्हा उरात धडकी भरवतं. कोल्हापूरसाठी वरदायिनी असेलल्या पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement