एक्स्प्लोर

कोल्हापुरात सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट, महिलेचा होरपळून मृत्यू

सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली.

कोल्हापूर : कोरोनाव्हायरसने धडक दिल्यापासून सॅनिटायझरची बातमी आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. मात्र सॅनिटायझर संपल्यानंतर त्या बाटलीची विल्हेवाट लावताना थोडी काळजी घ्या. कारण सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट होऊन एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापुरातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता काशिद असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

सुनीता काशिद आज (4 जानेवारी) सकाळी घरातील केरकचरा गोळा करुन तो घरासमोर पेटवत होत्या. या कचऱ्यात सॅनिटायझरची बाटलीही होती. त्यावेळी कचऱ्यातील सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की सुनीता काशिद त्यात 80 टक्के भाजल्या होत्या. आग विझवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु त्यात अपयश आलं. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान कोरोना महामारीचं संकट आल्यापासून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझर दिसू लागलं. परंतु सॅनिटायझर हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे सॅनिटायझर लावून गॅस किंवा स्टोव्हच्या जवळ जाऊ नये, असं वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे कोल्हापुरातील या धक्कादायक प्रकारानंतर सॅनिटायझर वापरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर

Embed widget