एक्स्प्लोर

Kokan Rain : पावसाचा कोकण रेल्वेला फटका; मस्त्यगंधा, एर्नाकुलम एक्सप्रेस, तेजस, जनशताब्दी पाच तासांपासून जागेवरच उभ्या

Konkan Railway : माणगाव रेल्वे स्थानकात दुरंतो, निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस, श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. 

मुंबई: रत्नागिरीतील पावसाचा (Ratnagiri Rain) कोकण रेल्वेला फटका बसला असून गेल्या चार ते पाच तासांपासून अनेक गाड्या रेल्वेस्थानकांमध्ये उभ्या आहेत. दिवणखवटी स्थानकाजवळ रुळावर माती आल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. दरड कोसळल्यामुळे अडकून पडलेली कोकण रेल्वे आणखी काही तास ठप्प राहण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरी-सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे. श्री गंगानगर एक्सप्रेस कामथे स्थानकात, तेजस आणि जनशताब्दी एक्सप्रेस रत्नागिरीत, सावंतवाडी दिवा दिवाणखवटी स्थानकात थांबून ठेवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबवली आहे. 

मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेल वरून सव्वाचार वाजता निघाली आणि रोहा येथे मागील पाच तासापासून उभी आहे. खेड जवळ रुळावर दरड कोसळल्यामुळे गाडी थांबण्यात आली.रविवारी रात्री 9 वाजता सांगण्यात आले गाडी ही पुन्हा पनवेल स्टेशनला जाणार आहे. त्यानुसार इंजिनसुद्धा लावले. पण गाडी पुन्हा मडगाव बाजूला जाईल असं सांगण्यात आलं. त्यानुसार इंजिन काढण्यात आले. आता असं कळते की या गाडीच्यासमोर नेत्रावती एक्सप्रेस आहे. ती गाडी पनवेलला परत येत आहे. रेल्वेमध्ये कोणीही व्यवस्थित माहिती देत नसल्याने प्रवासी संभ्रमित झाले आहे.

माणगावमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेस उभी

माणगाव रेल्वे स्थानकात दुरंतो, निजामुद्दीन एर्नाकुलम एक्सप्रेस गाडी चार तास उभी आहे. कोकण विभागातील दिवाणखवटी ते विन्हेरे या भागांमध्ये दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प आहे. मात्र याचा फटका प्रवाशांना चांगलाच बसलेला दिसतोय. एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे दरड कोसळण्याचे प्रकार यामुळे कोकण रेल्वेला याचा चांगलाच फटका बसला आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.

रायगड जिल्ह्यातल्या माणगाव रेल्वे स्थानकात देखील प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. गेल्या पाच तासांपासून हे प्रवासी येथे अडकून पडले आहेत. अद्याप कधी रेल्वे सेवा सुरळीत होईल हे सांगणं कठीण आहे .

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर पाण साचलं

पुणे- मुंबई एक्सप्रेसवेवरील बोरघाटात पाणी साचल्यानं वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागतेय. मुंबईकडे जाणाऱ्या लेनमध्ये गुडघाभर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. छोट्या गाड्यांच्या चालकांची अधिक तारांबळ उडतेय. कारण एकीकडे पाण्यातून वाट काढण्याचं आव्हान आहे, तर ते पूर्ण केल्यावर गाडी बंद पडण्याची देखील भीती असते. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget