एक्स्प्लोर

अमृता फडणवीसांना आवरा, किशोर तिवारींचं आरएसएसला पत्र

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल अकाऊंटवरुन त्या हल्ली मोठ्या प्रमाणावर राजकीय कोट्या करत आहेत. याचा संदर्भ घेत किशोर तिवारी यांनी सरळ त्यांना आवरण्यासंदर्भात आरएसएसला पत्र लिहिलं आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या राजकीय कोट्या देखील करत असतात. यावरुन बऱ्याचदा त्या ट्रोल देखील होतात. मात्र आता अमृता फडणवीस यांना आवरा अशा आशयाचं पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. नुकतंच भैय्याजी जोशींनी फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य केलं होतं. अमृता फडणवीस या जर असेच संबंध वाईट करत राहिल्या तर देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील, असं तिवारी यांनी पत्रात म्हटलं आहे. सोबतच तिवारी यांनी अगदी जशोदाबेन, रश्मी ठाकरे, कांचन गडकरी, शर्मिला ठाकरे ह्यांच्या वागण्याचे दाखले दिले आहेत. तर मला जे म्हणायचे होते ते मी ट्विटमध्ये म्हटले आहे. पत्र मी बघितले नाहीये, वाचले ही नाहीये त्यामुळे मला त्यावर आता काही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे.

कोषातल्या रेशीम किड्याशी तुलना करत अमृता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. तसंच याआधी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांची बाजू घेण्यासाठी अमृता फडणवीसांनी विरोधकांवर, विशेषतः शिवसेनेवर टिप्पणी करत राजकीय वादात उडी घेतलीय. या मुद्याला हात घालत किशोर तिवारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र पाठवून त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. त्यासाठी किशोर तिवारींनी भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीदाराच्या आदर्श वर्तनाची आठवण करुन दिली आहे.

या पत्रासंदर्भात बोलताना किशोर तिवारी यांनी सांगितलं की, अमृता फडणवीसांकडून हे अपेक्षित नाही. त्यांनी त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य थोड्या दिवसासाठी आवरावे.  अशाने देवेंद्र फडणवीस यांचे करियर खराब होईल. भाजपच्या खूप ज्येष्ठ नेत्यांना ही चिंता आहे. प्रवक्ते भूमिका मांडतील असे या गटाचे ही म्हणणे आहे. पत्नीने खुलासे का करावे? असा सवाल तिवारींनी केला आहे. तिवारी म्हणाले की, या संदर्भात मी भैय्याजी जोशींना भेटणार आहे.  देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा नंतर माज आला आहे. आधीचे देवेंद्र आता राहिले नाहीत, असेही ते म्हणाले. मला आमदार करतो असे आश्वासन दिले होते. मग मला तुमची जात योग्य नाही असे म्हटले, ते शब्दाचे पक्के नाहीत, असंही तिवारी म्हणाले.

वाईट नेते मिळणं ही राज्याची चूक नव्हे; अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा

किशोर तिवारी यांनी भैय्याजी जोशी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांना राजकीय आगपाखड करण्यापासून आवरायला हवं. तुम्ही म्हटलं होतं की, भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. पण देवेंद्र आणि अमृता हे संबंध अजून खराबच करत आहेत. फडणवीस ह्यांची घमेंड आणि अति आत्मविश्वास हेच महाविकास आघाडी घडून येण्याचे खरं कारण आहे. अमृता यांचं राजकीय ऍक्टिव्हिझम हे भारतीय राजकारणातील पती-पत्नी संस्कृतीला धक्का लावणारे आहे, असं देखील पत्रात म्हटलं आहे.

Amruta Fadnavis | रेशीम किड्याशी तुलना करत आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीसांचा हल्लाबोल

पत्रात म्हटलं आहे की, राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या पाहायच्या असतील तर मीनाताई ठाकरे, रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे ह्यांची राज्यात उदाहरण आहेत. तर केंद्रात अमित शाह ह्यांच्या पत्नी, नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल किंवा राजनाथ सिंह यांच्या पत्नी आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांबाबत कधीही अपशब्द वापरत नाहीत.

तिवारी यांनी म्हटलं आहे की, राज्यात तसेही भाजपकडे महिला नेतृत्व उरले नाही. मात्र अमृता फडणवीस संघ विचारधारेला मान्य आहेत का? त्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. त्यांचे हे गरज नसलेले राजकीय ऍक्टिव्हीझम समविचारी हिंदू पक्षांमध्ये संबंध खराब करत आहे. अशा दुखी महिलांमुळे 2024 मध्ये भाजपचे नुकसान होऊ नये, असं देखील तिवारी यांनी म्हटलं आहे.

अमृता फडणवीसांना आवरा, किशोर तिवारींचं आरएसएसला पत्र

अमृता फडणवीसांना आवरा, किशोर तिवारींचं आरएसएसला पत्र

अमृता फडणवीसांकडून आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी 100 कोटी नागरिकांवर 15 कोटी भारी असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली होती. फडणवीस यांनी तुम्ही बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही घातलेल्या नाहीत, असं म्हटलं होतं. यावर आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर देत 'देवेंद्र फडणवीसजी, सामान्यपणे मी टीकेला उत्तर देत नाही. मात्र या बांगड्या घातल्या आहेत टीकेबद्दल तुम्ही माफी मागायला हवी. सर्व शक्तीशाली, सामर्थ्यवान महिला बांगड्या घालतात. आपलं राजकारण सुरु राहिलं पण आपल्याला अशापद्धतीने टीका करणं बंद केलं पाहिजे. माजी मुख्यमंत्र्यांनी अशी टीका करणे अपमानास्पद वाटतं', असं म्हटलं होतं. यावर आदित्य यांना उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी 'रेशमी किड्याला आयुष्यातील ‘उपहास’ समजणार नाही. कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन ‘रेशमी’ आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या संघर्षाचा आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मेहनतीचा अभिमान वाटतो', असं म्हणत पलटवार केला होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget