कर्जमाफी, ओला दुष्काळ ते 50 हजारांची नुकसान भरपाई, शेती प्रश्नावरुन किसान सभा आक्रमक
राज्यात अतिवृष्टीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत.
Kisan Sabha : राज्यात अतिवृष्टीमुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत. अतिवृष्टीग्रस्त मराठवाड्यातील जिल्ह्यांचा किसान सभा, शेतमजूर व सीटू कामगार संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी नगर या ठिकाणावरून दौरा सुरू करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर तातडीने भरपाई व शेतमजुरांना श्रम नुकसान म्हणून 25 हजार रुपयांची मदत सरकारने करावी या प्रमुख मागण्यांसह एकूण 9 मागण्यांची जनजागृती या दौऱ्यात करण्यात येणार आहे. दिनांक 30 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी या तीनही संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे.
नेमक्या काय आहेत मागण्या?
1) ओला दुष्काळ जाहीर करावा.
2) शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई मदत तातडीने द्यावी.
3) रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना, ग्रामीण व शहरी कामगारांना श्रमनुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब तातडीने 30 हजार रुपये महिना मदत द्यावी.
4) शेतकऱ्यांना संपुर्ण कर्ज माफी देण्यात यावी.
5) प्रधानमंत्री पिक विमा योजनेत यापुर्वी असलेले
1. पेरणी न होण्याची परीस्थिती (Prevented Sowing)
2. प्रतिकुल हवामान (Mid season Adversity),
3. स्थानिक अपदा (Local Calamity)
4. पिक कापणी पश्चात आपदा (Post Harvest Calamity) संरक्षण पुन्हा लागू करावे
यायोजना कॉर्पोरेट कंपन्याऐवजी शेतकऱ्यांच्या लाभाची बनेल यासाठी योजनेत बदल करावेत.
6) अतिवृष्टी व पुरामुळे रस्ते, पुल, बंधारे, तलाव, विज वितरण कंपनीचे रोहीत्र, विजेचे खांब वाहून गेलेले आहे त्याची दुरुस्ती करणेबाबत विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबवून दुरुस्ती करावी.
7) ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना जमीन बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा.
8) ज्या शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्या पशुधनाची भरपाई म्हणुन बाजार मुल्याप्रमाणे रक्कम द्यावी.
9) अतिवृष्टीमुळे ज्या नागरीकांच्या घराची व जनावरांच्या गोठयांची पडझड झाली आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.
10) शाळा महाविद्यालयातील पदवी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींची सर्व फी माफ करावी.
सरसगट पीक विमा देण्याचे आदेश सरकारने द्यावेत
हमीच निसर्गाच्या लहरीपणाने अस्मानी संकटाला झुंज देत आलेलं आहे. अतिवृष्टी, गारपीठ, अवकाळी तर कोरडा दुष्काळ हे येथील शेतकऱ्यांच्या पाचीला पुजलेले. या सर्व परिस्थितीत निसर्गाशी दोन हात करत सत्ताधा-यांच्या शेतकरी विरोधी धोरणांचा सामना देखील येथील शेतकऱ्यांना करावा लागतोय. खरीप २०२५च्या सुरुवातीला झालेला अवकाळी आणि खरिपाच्या हंगामात झालेली अतिवृष्टी, ढगफुटी सदृष्य पावसाने जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती उध्वस्त झाली असून संपूर्ण कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करत सरसगट पीक विमा देण्याचे आदेश सरकारने द्यावेत, अशी मागणी शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी पत्रकार परिषद घेत केली.























