एक्स्प्लोर
सोलापुरात चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलीचं अपहरण, एका मुलीवर लैंगिक अत्याचार
एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोलापुरात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय आरोपी जयेश राजू ऊर्फ राजेश गायकवाड याला अटक केली आहे.

सोलापूर : चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलीला पळवून नेत एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. 24 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
काल दुपारी तीनच्या सुमारास दमाणी नगर परिसरातील एका मैदानावर या तिन्ही अल्पवयीन मुली खेळत होत्या. त्यावेळी 21 वर्षीय आरोपी जयेश राजू ऊर्फ राजेश गायकवाड हा तिथे आला. त्याने या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवले. मी तुमच्या वडिलांना ओळखतो, ते माझे मित्र आहेत. माझ्यासोबत चला मी तुम्हाला चॉकलेट देतो असे म्हणून त्याने या तिन्ही मुलींना गाडीवर बसवून एका ठिकाणी नेले.
आरोपी जयेश गायकवाड याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार एका वयोवृद्ध वॉचमनच्या लक्षात आला. वॉचमनने आरोपीला हटकले आणि मुलींना जिथून आणलं आहे तिथे परत सोड अशी सूचना केली. मात्र आरोपी जयेश यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. दुसऱ्या एका ठिकाणी या तिन्ही मुलींना आरोपींने नेलं. या निर्जनस्थळी नराधमाने एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं देखील पोलिस तपासात उघड झालं आहे.
घटनेनंतर आरोपी जयेश याने मुलींना एका भाजीमंडई जवळ सोडलं. घटनेनंतर मुलींनी न घाबरता पोलिसांना घटनेची सर्व माहिती सांगितली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत अवघ्या 24 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याविरोधात मुलींचे अपहरण करुन एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोक्सो कायद्याच्या कलमांसह भांदवि 376, 363 सह अँट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
आरोपी जयेश गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर या आधी देखील चोरी, जबरी चोरी, चेन स्नँचिग सारखे विविध गुन्हे दाखल आहे. आरोपी विरोधात जवळपास 25 गुन्हे या आधी दाखल असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली. सराईत गुन्हेगार असलेल्या या आरोपी विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई कऱण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली. पोलिस आयुक्त अंकूश शिंदे, उपायुक्त डॉ. कडूकर, सहा. आयुक्त कमलाकर ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट, प्रविण पाटील, सपोनि रमेश भंडारे, पोसई सोमनाथ देशमाने, पो.कॉ. दत्तात्रय कोळवले, विनायक होटकर, नितीन जाधव, तलवार आणि नितीन लवटे या पथकाने ही कार्य़वाही केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
