Raj Thackeray Grandson Name : राज ठाकरेंच्या नातवाचं नाव 'किआन'; कुणी सुचवलं हे नाव ?
Raj Thackeray Grandson Name : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव किआन असं ठेवण्यात आलं आहे.
Raj Thackeray Grandson Name : 5 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली बोरूडे (Mitali Borude) यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती. बाळाचा जन्म झाल्यापासून या बाळाचे नाव नेमके काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता होती. मात्र, आता बाळाचं बारसं झालं आहे. आणि यानुसार बाळाचं नाव 'किआन' (Kiaan) असं ठेवण्यात आलं आहे. शिवतीर्थ निवासस्थानी हा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे.
कुणी सुचवलं बाळाचं नाव ?
बाळाचं नाव हे किआन असं जाहीर करण्यात आल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतकं युनिक नाव सुचवलं कुणी? तसेच या नावाचा अर्थ काय? तर मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. संजय बोरूडे म्हणजेच बाळाच्या आजोबांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे नाव हे त्याच्या आईनेच म्हणजे मिताली बोरूडे यांनी सुचविले असल्याचे सांगण्यात आले आहे.
किआन या नावाचा नेमका अर्थ काय ?
खरंतर, किआन या नावाचे अनेक अर्थ आहेत, त्यानुसार 'किआन' हे हिंदू धर्मातील नाव आहे. किआन म्हणजेच या नावाचा अर्थ देवाची कृपा (Grace of God), प्राचीन (Ancient), राजेशाही (Royal) असा आहे. याची रास मिथून असून नक्षत्र मृग आहे. अंक ज्योतिषानुसार 9 हा शुभ क्रमांक (लकी नंबर) आहे. तसेच, हलका पिवळा, हिरवा, गुलाबी आणि पांढरा हे रंग या राशीसाठी शुभ आहेत. तर, शुभ दिन बुधवार आहे. राशीनुसार जर करिअरचा विचार केला तर, शिक्षक, कवी, गीतकार, संगीतकार, ज्योतिषी, बॅंकिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फायनान्स या क्षेत्रात यश मिळण्याचे संकेत आहेत.
महाकट्ट्यावर नातवाबाबत काय म्हणाले होते राज ठाकरे ?
गेल्याच आठवड्यात माझा कट्ट्याच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे महाकट्टा कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा नातवाच्या नावाविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. राज ठाकरे यांनी नातवाच्या नावाविषयी 'परदीप' असं मिश्किलपणे सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या :