Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई, सरपंच, सलग तीन वेळा खासदार ते आता केंद्रीय मंत्री, असा आहे रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
Khasdar Raksha Khadse : रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या भाजपच्या रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे.
BJP Khasdar Raksha Khadse Profile : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए (NDA) सरकारचा आज शपथविधी होणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी 7.15 वाजता हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. आज 40 ते 45 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून रावेरच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना केंद्रीय मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. यानिमित्त जाणून घेऊयात रक्षा खडसे यांची राजकीय कारकीर्द...
जळगावच्या राजकारणात नेहमीचा खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. रक्षा खडसेंना आता केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्यासोबत झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
कोण आहेत रक्षा खडसे?
नाव : श्रीमती. रक्षा निखिल खडसे
जन्म तारीख : 13/05/1987
वय : 37 वर्षे
शैक्षणिक पात्रता : बी. एससी (संगणक शास्त्र)
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, गुजराथी, इंग्लिश
पतीचे नाव : स्वर्गीय. निखिल एकनाथराव खडसे (जिल्हा परिषद सदस्य- 2007 ते 2012)
सासऱ्यांचे नाव : एकनाथ खडसे (माजी मंत्री, महसूल आणि कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य)
पक्ष कार्य : २०१० पासून
राजकीय कार्य पुढीलप्रमाणे
1. सरपंच कोथळी, तालुका. मुक्ताईनगर, जिल्हा- जळगाव, महाराष्ट्र.
2. जिल्हा परिषद - जळगाव जिल्हा सदस्य आणि अध्यक्ष ( सभापती) आरोग्य विभाग, शिक्षण आणि क्रीडा समिती जिल्हा परिषद, जळगाव,
3. 2014 ते 2019 पर्यंत पहिल्यांदा खासदार
4. 2019 te 2014 पर्यंत दुसर्यांदा खासदार
5 . 2024 साली तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या.
संसदेतील समितीच्या सदस्य
1. माहिती व तंत्रज्ञान
2. महिला सक्षमीकरण
3. इतर मागासवर्गीय कल्याण ( ओ बी सी )
4. सल्लागार समिती एम/ओ संस्कृती आणि पर्यटन
5. नेशनल इंस्टिट्यूट ऑफ फैशन बोर्ड ऑफ गव्हर्नन्स तंत्रज्ञान (NIFT)
6. आंतरराष्ट्रीय संसदीय मंच जिनिव्हाचे बोर्ड सदस्य, स्विट्झरलँड
7. सल्लागार समिती ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयावरील सल्लागार समिती.
'या' देशांमध्ये दिली आहे भेट
1. दक्षिण आफ्रिकेतील युवा संसदेसाठी भारत सरकारचे प्रतिनिधित्व करणारे एकल सदस्य शिष्टमंडळ.
2. चेवेनिंग पार्लियामेंट प्रोग्राम सदस्य म्हणून लंडन यूनायटेड किंगडम ला भेट दिली.
3. लोकसभा स्पीकर मा. सुमित्रा महाजन यांचा नेतृत्वा मधे भारतीय शिष्टमंडळाचे सदस्यत्व, रशिया.
4. महाराष्ट्र ट्रेड प्रमोशन, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
5. भाजपचे राजकीय संशोधन, पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन
6. माद्रिद स्पेन आयपीयूच्या 143 व्या असेंबलीला उपस्थिती
8. इंडोनेशिया, बाली आयपीयूच्या 144 व्या असेंबलीला उपस्थिती.
आणखी वाचा
पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ते आता केंद्रीय मंत्री, प्रतापराव जाधवांचा प्रवास