एक्स्प्लोर

एक होती इर्शाळवाडी! 40 हून अधिक घरं डोंगराखाली; थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेत गेल्या 12 तासांत काय काय घडलं?

पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या सर्वांना गुरुवारची सकाळ पाहताच आली नाही.

Khalapur Irshalwadi Landslide : रायगड (Raigad News) परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेले इर्शाळवाडी हे गाव... रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात  30 ते 40 घरं नागरिकांसह गाडली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या सर्वांना गुरुवारची सकाळ पाहताच आली नाही. जीवाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. मध्यरात्रीपासूनच बचावकार्याला सुरुवात झाली  मात्र अंधार असल्याने बचावकार्य थांबवण्यात आले. आता बचावकार्य सुरू झाले असून रात्री 10 ते  सकाळी 10 या 12 तासाचा घटनाक्रम जाणून घेऊया

आतापर्यंत काय घडले?

  • साधारण रात्री 10.30 च्या सुमारास मासेमारी करून या गावातील काही लोक घरी जात होते
  •  11 वाजता डोंगराचा काही भाग खचत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं 
  •  काही वेळाने घरं माती खाली गेली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं
  • 11:30 वाजता गावातील  सरपंच  आणि काही गावकरी घटना स्थळी पोहचले
  • 12 वाजता  त्यांनी स्थानिक पोलीस आणि यांना तहसील कार्यालयाला याबाबत कळवलं
  • 12 : 30 वाजता स्थानिक पोलीस व रुग्णवाहिका इतर प्रशासन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले
  • 1 ते 1:30 दरम्यान स्थानिक आमदार महेश बालदी कार्यकर्त्यांसह दाखल  झाले
  • 2 वाजता  घटनास्थळी गिरीश महाजन आले आणि पाहणी केली
  • 2.30 वाजता उदय सामंत , दादा भुसे दाखल झाले आणि पाहणी केली
  • 2.45  वाजता ndrf टीम दाखल झाली  
  • 4 वाजेपर्यंत घटना घडली तेव्हापासून स्थानिक लोकं आणि उपस्थित असलेले प्रशासनाचे काही कर्मचारी लोकांना बाहेर काढत होते.  शोध कार्य करत होते
  • 4.30 वाजता शोधकार्य मोहिमेसाठी पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी देखील दाखल झाले
  •  5 वाजण्याच्या सुमारास  रेस्क्यू टीम वर जात असताना एका अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
  •   5.30 वाजेपर्यंत 25 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं तर चार जणांचा मृत्यू झाला होता
  • सकाळी 6 च्या सुमारास इतर यंत्रणा रेस्क्यूसाठी पुन्हा वर गेल्या 
  • 6.30 वाजता एनडीआरएफ सहा इतर पथकांचे शोध कार्य सुरू झाले  
  • सकाळी 7.30 वाजता  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल 
  • सकाळी 7.45 वाजता हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं केले जाणार त्यासाठी सीएम कडून फोन केला गेला
  • 8. 45 वाजता मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत
  • 9.16 वाजता 80 लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश. पाच जणांचा मृत्यू.
  • 9.45  दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांचा आक्रोश 

दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या 80 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर  70 ते 80 जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget