एक्स्प्लोर

Kalyan Dombivali News : 10 वर्षानंतरही बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थी घरांपासून वंचित, राष्ट्रवादीने दिला 'हा' इशारा

Kalyan Dombivali News : 10 वर्षानंतरही बीएसयूपी प्रकल्पातील घरे लाभार्थ्यांना अद्याप मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

Kalyan Dombivali News : कल्याण कचोरे येथे बीएसयूपी योजनेअंतर्गत घरकुल योजना राबवण्यात आली. ही इमारत निर्माण करून 10 वर्ष झाली, त्यानंतर या घरांची दुरवस्था झाली. मात्र पात्र लाभार्थी अद्याप घरांच्या प्रतीक्षेत आहेत. आता या रखडलेल्या घरांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा तापू लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली मध्ये विविध ठिकाणी कोट्यवधींचा निधी खर्च करत गरिबांसाठी घरकुल योजना राबवण्यात आली. या इमारती उभ्या राहिल्या खऱ्या मात्र अद्यापही शेकडो  पात्र लाभार्थी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे बाधित पात्र लाभार्थी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असताना या इमारतींच्या खिडक्या, दरवाजे, लिफ्ट, खोल्यांची दुरवस्था झाली आहे. काही खोल्यामधील वस्तूदेखील चोरीला गेल्या आहेत. 

शिवसेना ,भाजप ,मनसे ,काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील विविध प्रकल्पात बाधित नागरिकांच्या पुनर्वसन प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी कल्याण कचोरे भागातील बीएसयूपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींची पाहणी केली. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. याबाबत बोलताना तपासे यांनी म्हटले की, या ठिकाणी अनेक पात्र लाभार्थी आजही घरांच्या प्रतिक्षेत आहेत. हा विषय केंद्रातील संबंधित मंत्र्याच्या कानी घालणार आहोत. इमारत बनवून 10 वर्ष झाली मात्र पात्र लाभार्थी अद्याप घरांच्या प्रतीक्षेत आहेत याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. मात्र, ही गडबड काय आहे, याचा शोध घेण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले. लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी आंदोलन करू. या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांना तुरुंगात पाठवण्याची व्यवस्था करू असाही इशारा त्यांनी दिला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडीSaif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
बिहारचे सिंघम शिवदीप लांडेचा राजीनामा अखेर स्वीकारला; अवघ्या काही दिवसांमध्येच तीन धडाकेबाज अधिकाऱ्यांचा खाकी वर्दीला 'रामराम'
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
सैफ अली खान हल्ला प्रकरण, हल्लेखोर मोहम्मद शहजादला 5 दिवसाची पोलिस कोठडी
Ajit Pawar : बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
बीडचे पालकमंत्रिपद मिळताच अजितदादांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीच्या शिबिरातून सांगितली पुढील रणनीती
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Embed widget