एक्स्प्लोर
Advertisement
कर्नाटक सरकारची मग्रुरी; सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी
सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे.. कर्नाटक सरकारच्या मग्रुरीविरोधात महाराष्ट्रातील साहित्यिक निषेध सभा घेणार आहेत.
कोल्हापूर : सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना गावबंदी घालण्यात आली आहे. कर्नाटकातल्या खानापूर तालुक्यातील इदलहौंगमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार होते. या संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना कर्नाटक पोलिसांनी गावात प्रवेश नाकारला आहे. अशाप्रकारे कानडी सरकारकडून मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या विरोधात महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन साहित्यिक निषेध सभा घेणार आहेत.
कर्नाटकातल्या खानापूर तालुक्यातील इदलहोंडमध्ये गुंफन मराठी साहित्य संमेलन होणार होते. या संमेलनासाठी महाराष्ट्रातल्या साहित्यिकांना कर्नाटक पोलिसांनी गावबंदी केली आहे. कर्नाटक सरकारच्या या मग्रुरी विरोधात महाराष्ट्रातील साहित्यिक एकत्र येत निषेध सभा घेणार आहेत.
मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न -
सीमावासी मराठी भाषिकांचा आवाज दाबण्याचा कर्नाटक सरकारकडून वारंवार प्रयत्न होत आहे. रविवारी कुद्रेमानी आणि गर्लगुंजी येथे आयोजित मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकी पोलिसांनी घेतली आहे. यासाठी आयोजकांवर दबाव टाकण्यात येत आहे. कुद्रेमानी आणि इदलहोंड येथे दोन साहित्य संमेलने आयोजित करण्यात आली आहेत. इदलहोंड येथें 17 वे गुंफण साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस आहेत.
संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना प्रवेश नाकारला -
ईदलहोंड येथे आयोजित करण्यात आलेल्या सतराव्या सदभावना मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रातून आलेल्या संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आहे. आता पोलीस साहित्य संमेलनात देखील दडपशाही करत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी तानाजी चित्रपटाचे पोस्टर उतरविण्यास भाग पाडले होते. सीमाभागात मराठी भाषा, संस्कृतीची दडपशाही करुन गळचेपी पूर्वीपासून केली जाते. पण आता कर्नाटक सरकारने मराठी साहित्य संमेलनाकडे आपली वक्रदृष्टी वळवली आहे. महाराष्ट्रातील डॉ. श्रीपाल सबनीस यांना ईदलहोंड येथे प्रवेश नाकारुन मराठी द्वेष्टेपणाचे दर्शन घडवले आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद मिटेना -
काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन सीमा भागात हिंसाचार उफाळून आला होता. कनसेकडून महाराष्ट्रातून बेळगावात जाणाऱ्या बसेस फोडण्यात आल्या. तर, मराठी पाट्यांचीही तोडफोड करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना गोळ्या घालण्याची भाषा कनसेच्या नेत्याने केली होती.
संबंधित बातमी - कर्नाटकमध्ये मराठी माणसांवरील अन्याय लोकशाहीला शोभण्यासारखा नाही, वेळ पडली तर न्यायालयात जावू : मुख्यमंत्री
Belgaum Border Dispute | सीमाभागात होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातच्या साहित्यिकांना बंदी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement