एक्स्प्लोर
मनसे आक्रमक, शहराध्यक्षाच्या हॉटेलच्या पाटीलाही काळं फासलं!
कल्याण : शिवसेनेच्या ठाण्यातील फेरीवाला हटाव आंदोलनानंतर आता कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक झाली आहे. आज मनसेने कल्याणमधील शिवाजी चौकातील इंग्रजी नाव असणाऱ्या पाट्यांना काळं फासलं. पण यावेळी मनसेचा फोलपणाही उघडकीस आला.
पण इंग्रजी नावं असलेल्या पाट्यांना काळं फासताना कार्यकर्त्यांनी मनसेच्याच शहराध्यक्षाच्या हॉटेलाही काळं फासलं. आंदोलन सुरु असतानाच खुद्द कल्याणमधील मनसे शहराध्यक्षाच्या हॉटेलचं नावंही इंग्रजीतच निघालं. त्यामुळे या हॉटेलच्या पाटीलाही काळं फासण्यात आलं. कल्याणमध्ये मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांचं सृष्टी नावांच हॉटेल असून सध्या या हॉटेलची मालकी त्यांच्या काकांकडे आहे.
कल्याणमध्ये सृष्टी नावाचं हॉटेल आहे. या हॉटेलचा मालक मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आहे. हॉटेलच्या नावाची प्लेटही इंग्रजीत असल्याने त्याला काळं फासलं.
एरव्ही मराठी मुद्द्यावरुन मनसे अनेक आंदोलनं करते. परंतु त्यांच्याच पक्षाच्या शहराध्यक्षाच्या हॉटेलची पाटी इंग्रजीत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
विश्व
Advertisement