एक्स्प्लोर
... तर नागपूर-हैदराबाद रेल्वे प्रवास केवळ तीन तासात
नागपूर-हैदराबाद रेल्वे प्रवासाला सध्या 9 तास लागतात. मात्र रेल्वे मंत्रालयाचा नवीन प्रस्ताव मार्गी लागल्यास या प्रवासाला केवळ तीन तास लागतील.
नागपूर : रेल्वे मंत्रालय नागपूर - हैदराबाद या मार्गावर लवकरच हायस्पीड ट्रेन आणण्याच्या तयारीत आहे. या रेल्वे मार्गामुळे नागपूर - हैदराबाद रेल्वे प्रवास नऊ तासांहून केवळ तीन तासांवर येणार आहे.
सध्या नागपूर-हैदराबाद रेल्वे प्रवासाला 9 तास लागतात. मात्र रेल्वे मंत्रालयाचा नवीन प्रस्ताव मार्गी लागल्यास या प्रवासाला केवळ तीन तास लागतील. रेल्वे मंत्रालयाने याबाबात रशियन रेल्वे मंत्रालयाशी चर्चा सुरु केली आहे.
रेल्वे बोर्डाने रशियन रेल्वे बोर्डाला यासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. हा अहवाल जर मान्य झाला तर या प्रकल्पावर तात्काळ काम सुरू करण्यात येणार आहे.
सध्या 584 किलोमीटरचं हे अंतर कापण्यासाठी रेल्वेने 9 तास लागतात. कारण ट्रेनचा स्पीड ताशी 60 किमी आहे. मात्र हा प्रकल्प तयार झाल्यानंतर रेल्वेचा वेग ताशी 160 ते 200 किमीवर नेता येईल.
दिल्ली ते चंदीगड या उत्तर भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्गावर हा हायस्पीड कॉरिडॉर तयार करण्यासाठी मान्यता देण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे रेल्वेचा ताशी वेग 200 किमी प्रती तास एवढा होईल. या प्रकल्पासाठी फ्रान्सची मदत घेतली जाणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement