एक्स्प्लोर

Jitendra Awhad : सत्य समोर येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनीही एखादा चित्रपट काढावा; आमदार जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला 

Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एखादा सिनेमा काढावा, जेणेकरून लोकांना सत्य काय आहे ते कळेल. असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील एखादा सिनेमा काढावा, जेणेकरून लोकांना सत्य काय आहे तेही कळेल. सिनेमांमध्ये बऱ्याचशा गोष्टी खोट्या दाखवतात, तसेच खऱ्या गोष्टी देखील दाखवता येत असतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची देखील तयारी असल्यास त्यांनी देखील एखादा सिनेमा काढून कुणाचे मुखवटे फाडायचे आहेत तर जरूर त्यांनी हे काम केलं पाहिजे, असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. 

नुकताच बहुप्रतिक्षित 'धर्मवीर-2' (Dharmaveer 2) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. या सोहळ्याला सिनेमातील कलाकारांसह अशोक सराफ, महेश कोठारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची देखील उपस्थिती होती. धर्मवीर-2 या सिनेमाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. कारण या सिनेमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणत्या घटनेचा उलगडा केला जाणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याचं उत्तर येत्या 9 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांत प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र त्याआधीच सिनेमातील काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं असताना या सिनेमामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. अशातच आज या चित्रपटावरुन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीसांनीही एखादा चित्रपट काढावाच! -जितेंद्र आव्हाड

देवेंद्र फडणवीस यांची देखील एखादा सिनेमा काढण्याची तयारी असल्यास त्यांनी देखील एखादा सिनेमा काढला पाहिजे. या सिनेमाच्या रूपाने महाराष्ट्रातील जनतेला हे कळाले देखील पाहिजे की कुणाचे मुखवटे आणि कुणाचा चेहरा कसा आहे. किंबहुना या निमित्ताने ते सर्वांना कळेल, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.नुकताच धर्मवीर या चित्रपटाचा दुसऱ्या भागाचा टेलर प्रदर्शित करण्यात आलं. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मला देखील एक चित्रपट काढायचा असून हा चित्रपट प्रदर्शित झाला तर अनेकांचे मुखवटे बाहेर पडतील, असे बोलताना फडणवीस म्हणाले होते. आता याच मुद्द्याला घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत उत्तर दिले आहे.

मुंबई महानगरपालिका म्हणजे रोज 50 लिटर दूध देणारी दुभती गाय 

डिंपल चड्डा नामक एका व्यवसायिकेला कुठलाही अनुभव नसताना त्यांना 400 कोटी रुपये दिले जाणार आहे. म्हणजे राज्यात कर्जातून सरकार चालत असल्याचे चित्र आहे. या सरकारला मराठी माणसं दिसतच नाही. परिणामी ते त्यांना बिनव्याजी नाहीत तर त्यांना घरात जाऊन देखील पैसे पोहोचवतील, अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. नुकतीच मुंबई महानगरपालिकेमध्ये मी एक प्रकरण ऐकलं यामध्ये  ज्या बिघडलेल्या मशीन ज्याची मूळ किंमत वीस हजार रुपये आहे, त्याची बिलामध्ये 65 हजार रुपये एवढी किंमत दाखवली आहे. हा जवळजवळ कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे. ड्रीम सोल्युशन नामक ही एक कंपनी असून या कंपनीमध्ये काम करणारे सर्व कामगार हे हैदराबाद येथील आहे. दुसरीकडे राज्यात  शिक्षण घेऊन देखील तरुणांच्या हाताला काम मिळत नाही आहेत. सध्या घडीला मुंबई महानगरपालिका 50 लिटर दूध देणारी दुभती गाय असल्याची ल्याची टीकाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ही ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray on Saugat-e-Modi : बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगाते मोदी देणारShivsena Uddhav Thackeray PC : भाजपने हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, ठाकरेंची सडकून टीकाNashik Trimbakeshwar Kumbhकुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा?साधूमहंतांचं म्हणणं काय?Special ReportABP Majha Headlines 12 PM Top Headlines 12 PM 27 March 2025 दुपारी 12 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
त्यामुळे शिवसैनिक गप्प आहेत, कुणाल कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देऊ : शंभूराज देसाई
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
रेल्वे स्टेशनवर कन्फर्म तिकीटवाल्यांना एंट्री, गर्दी टाळण्यासाठी नवी यंत्रणा; रेल्वेमंत्र्यांची संसदेत माहिती
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
ठाकरेंच्या खासदाराकडून भर सभागृहात नितीन गडकरींचं कौतुक, तुकोबांचा अभंगही गायला!
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
हिंदू राष्ट्र, महामारी, भूकंप उष्णता ते जलप्रलय, बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात डोणे महाराजांची भाकणूक  
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
त्यांनीच धनंजय मुंडेंना वाचवलं, पण गृहमंत्र्यांनी 302 दाखल करावं; कोर्टातील सुनावणीनंतर मनोज जरागेंचा थेट इशारा
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
22 टक्के हिंदू देश सोडून जात असल्याने 'सौगात ए मोदी' राजकीय दृष्टीनं केलेला कार्यक्रम, मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
एकनाथ शिंदेंचं नामकरण ते दिशा सालियन प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या वादळी पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
Prakash Ambedkar: देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
देवेंद्र फडणवीसांनी भीमा कोरेगावसारखी चूक पुन्हा करु नये, संभाजी भिडेंना तात्काळ जेलमध्ये टाका: प्रकाश आंबेडकर
Embed widget