एक्स्प्लोर
सराफ संघटना पुन्हा संपावर, तीन दिवस दुकानं बंद
पुणे : वाढीव एक टक्का अबकारी कराविरोधात राज्यातील सराफ संघटना आजपासून पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्याचं सांगत सराफ संघटनांनी तीन दिवस दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व मोठ्या शहरांमधील सराफ संघटना या संपामध्ये सहभागी होणार आहेत.
चर्चेचं आश्वासन मिळाल्यानंतर सराफांनी एक महिन्यानंतर संप मागे घेतला होता. मात्र मागण्यांवर सकारात्मक विचार न झाल्याचा दावा करत सराफ संघटनांनी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उगारलं आहे.
त्यामुळे आता सराफांच्या मागणीवर सरकार कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement