जेजुरी भंडारा आग प्रकरण! ही बाब गंभीर, दोन दिवसांत कारवाई होणार, मंत्री झिरवाळ यांची माहिती
जेजुरी नगरपरिषद निकालाच्या (Jejuri Nagarparishad Election Result) उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली होती. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Pune Jejuri News : जेजुरी नगरपरिषद निकालाच्या (Jejuri Nagarparishad Election Result) उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली होती. जेजुरी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विजयोत्सवासाठी जमलेल्या गर्दीत भंडाऱ्याचा (Bhandara) भडाका उडाल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या आगीत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे. या चेंगराचेंगरीत एका 10 वर्षीय मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 21 तारखेला जेजुरीत भंडाऱ्यामुळे आग लागली असं सांगितलं गेलं. पण भंडारा पेट कधीच घेत नाही असे झिरवाळ म्हणाले. मात्र ही बाब तरीही गंभीर असल्याचे झिरवाळ म्हणाले.
पिशव्यातील 2200 किलोचा स्टॉक जप्त केला
या प्रकरणी औषध निरीक्षकांसह पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली आहे. प्लेन पिशव्यात त्यांना हळद सापडली आहे. 2200 किलोचा स्टॉक जप्त केला आहे. तो प्रयोगशाळेला पाठवल्याची माहिती नरहरी झिरवाळ यांनी दिली. दोन दिवसांत यावर कारवाई निश्चित केली जाईल. आगीचा भंडाऱ्याशी संबंध येत नाही असेही झिरवाळ म्हणाले.
नेमकं काय घडलं?
जेजुरी नगरपरिषद निकालाच्या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली होती. विजयाचा भंडारा उधळल्यानंतर आगीचा मोठा भडका (Jejuri Fire) उडाल्याचं दिसून आलं. या घटनेत 16 जण भाजले असून काही नगरसेवकांचाही त्यामध्ये समावेश आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी फटाके फुटत असताना भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला. जेजुरी नगरपरिषदेवर सत्तांतर होऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.
जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते. सोबतच भंडाऱ्याची उधळणही होत होती होते. त्यामुळे भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये 16 जण भाजले गेले. जमखींमध्ये नुकतेच निवडून आलेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली असून त्यामध्ये भाजले गेलेल्यांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या:























