एक्स्प्लोर

Jejuri : जेजुरीत विजयाचा भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका, 16 जण भाजले, नव्या नगरसेवकांचाही समावेश

Jejuri Fire : जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडाऱ्याची उधळण सुरू होती, त्याचवेळी फटाकेही फोडण्यात येत होते. त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि 16 जण भाजले गेले.

पुणे : जेजुरी नगरपरिषद निकालाच्या उत्साहाला गालबोट लागल्याची घटना घडली. विजयाचा भंडारा उधळल्यानंतर आगीचा मोठा भडका (Jejuri Fire) उडाल्याचं दिसून आलं. या घटनेत 16 जण भाजले असून काही नगरसेवकांचाही त्यामध्ये समावेश आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी फटाके फुटत असताना भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निकाल आज जाहीर झाला. जेजुरी नगरपरिषदेवर सत्तांतर होऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीने बाजी मारली. त्यानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.

Jejuri Nagar Parishad Election Result : भंडाऱ्याची उधळण आणि आगीचा भडका

जेजुरीत मतमोजणी पार पडून निकाल जाहीर झाल्यानंतर गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाचरणी भंडारा अर्पण करून आशीर्वाद घेताना फटाके वाजत होते. सोबतच भंडाऱ्याची उधळणही होत होती होते. त्यामुळे भंडारा उधळल्यानंतर आगीचा भडका उडाला आणि त्यामध्ये 169 जण भाजले गेले. जमखींमध्ये नुकतेच निवडून आलेल्या काही नगरसेवकांचा समावेश आहे.

ही घटना रविवारी दुपारी घडली असून त्यामध्ये भाजले गेलेल्यांना जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न जेजुरीमध्ये ऐरणीवर आला आहे.

Jejuri Result : जेजुरीत राष्ट्रवादीची बाजी

माजी आमदार संजय जगताप यांची जेजुरीमधील सत्ता खालसा करण्यात अजित पवारांना यश आलं आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारभाई मोठ्या फराकानं विजयी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीची 17 नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपनं नगरसेवकाच्या सगळ्या जागा लढवल्या, फक्त दोन ठिकाणी यश मिळालं. तर एका जागेवर अपक्ष निवडून आला. त्यामुळे जयदीप बारभाई यांना पक्षात घेऊन अजित पवारांनी केलेली खेळी यशस्वी ठरली. राष्ट्रवादीच्या या दणदणीत विजयानंतर जेजुरीमध्ये भंडाऱ्याची उधळण करत मोठा जल्लोष करण्यात आला.

Pune Election Result : पुण्यात अजितदादांची हवा

पुणे जिल्ह्यात आपलंच वर्चस्व असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. पुणे जिल्ह्यातील 17 नगरपरिषदा आणि नगरपालिकांपैकी 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विजयामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह मविआलाही धक्का बसला आहे.

बारामतीसह, लोणावळा, दौंड, शिरूर, इंदापूर, जेजुरी, भोर, वडगाव, माळेगाव आणि उरुळी फुरसुंगीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. या निकालानंतर जिल्हा कुणाच्या मागे आहे ते बघा, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
जो राम का नही, वो किसी काम का नही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले त्यांनी रामरक्षा वाचावी
जो राम का नही, वो किसी काम का नही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले त्यांनी रामरक्षा वाचावी
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल

Embed widget