एक्स्प्लोर

Jayakwadi Dam Water Storage: मराठवाड्याला मोठा दिलासा! अवघ्या 27 दिवसांत जायकवाडीत 25 टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा कुठवर? 

आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाचा मोठा फायदा मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाला (Jayakwadi Dam Water Storage) झाला आहे. अवघ्या 27 दिवसांत जायकवाडी धरणात सुमारे 25 टीएमसी पाण्याची भर पडली असून, धरणातील जिवंत पाणीसाठा 62 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

28 जुलै रोजी सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जायकवाडी धरणात 610.880 दशलक्ष घनमीटर  इतका जिवंत पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. वरच्या धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे धरणात पाण्याची आवक कायम असून, येत्या काही दिवसांतही पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अवघ्या 27 दिवसांत 25 टीएमसी पाण्याची भर

मान्सूनच्या सुरुवातीला जायकवाडी धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जुलै महिन्यात नाशिकसह गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. 1 जुलै रोजी धरणातील जिवंत पाणीसाठा 130. 659 दशलक्ष घनमीटर (27 टक्के) इतका होता. त्यानंतर अवघ्या 27 दिवसांत तो वाढून 610. 880 MCM (62 टक्के) इतका झाला आहे.

वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा

जायकवाडीतील सध्याचा पाणीसाठा छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा, सुमारे 300 गावांचा पाणीपुरवठा तसेच औद्योगिक वापरासाठी वर्षभर पुरेसा मानला जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, गोदावरीच्या वरच्या धरणांतून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीतील आवक कायम आहे. त्यामुळे आगामी काळातही पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्हा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला असून, धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, जायकवाडीतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी सिंचनाची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याची भविष्यातील गरज लक्षात घेता ही पाण्याची आवक अत्यंत दिलासादायक ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Solapur News: सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
सोशल मीडियावर माहिती पाहिली अन् मुलगी हट्ट धरून बसली; नागपंचमी पाहण्यासाठी इंग्लंडचा व्यावसायिक थेट नागोबाच्या 'शेटफळ'मध्ये दाखल
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget