एक्स्प्लोर
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात बार्शी तालुक्यातील जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असल्याची माहिती आहे. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.

पुलवामा: जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावमधील एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असल्याची माहिती आहे. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.
या दहशतवादी हल्ल्यात बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील दत्तात्रय काळे (41) हे शहीद झाले आहेत. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसंच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती. मात्र ते लॉकडाऊनमुळं ते तिकडं जाऊ शकले नाहीत.
आज पहाटे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे. सुनील काळे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांना शेतीची आवड होती. परिवाराची तसेच आपल्या मित्रांची काळजी घेणारे अशी त्यांची ओळख. त्यांची सुट्टी मंजूर होती, पण ते लॉकडाऊनमुळं येऊ शकले नाहीत, त्यांनी नवीन घर बाधलं, ते अद्याप तिथं राहायलाही गेले नाहीत, त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली असं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. त्यांच्या शहीद होण्याचे वृत्त कळताच पूर्ण पानगाव बंद करण्यात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. श्रीनगरमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, शहरातील जूनिमार परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षाबलाने या परिसराला घेरले आहे आणि सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी अभियानांतर्गत यावर्षी आतापर्यंत सुरक्षा बलाने 110 हून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. मागील वीस दिवसात 36 दहशतवादी मारले गेले आहेत. जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग यांनी सांगितलं की, हे दहशतवादी लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनशी जोडले गेले होते.

आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण