एक्स्प्लोर

Jalna Rain Yellow Alert : जालना जिल्ह्यासाठी उद्या 'यलो अलर्ट' जारी; विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Jalna Rain Yellow Alert : या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Jalna Rain Yellow Alert : मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार, जालना (Jalna) जिल्हयात 26  जुलै रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवली आहे. तसेच 27 ते 29 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

मागील आठवड्यात जालना जिल्ह्यात झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. मात्र अनेक भागात अजूनही पाऊस झाला नसल्याने पीके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यात अजूनही दमदार आणि अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात भर पावसाळ्यात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे जालनाकरांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. दरम्यान, उद्या जालना जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा वर्तवली जात आहे. तर तसेच 27 ते 29 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाळ्यात हे करा...

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल, तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

हे करु नका! 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

अतिवृष्टी! दोन दिवसांत नांदेडमधील 9 हजार हेक्टर शेती खरडून गेली; 2 लाख हेक्टरवरील पिके आडवी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Local Ticket : AI वापरून बनवला लोकलचा 'पास' पण टीसीपुढे नापास Special Report
Shahjibapu patil Home Raid : शहाजीबापूंवर धाड, महायुतीत भगदाड? Special Report
Rane VS Rane : भाऊ घरी, निवडणुकीत राजकीय वैरी, नितेश राणेंचा निलेशसाठी सावधगिरीचा इशारा Special Report
Sanjay Raut Is Back : संजय राऊतांचं कमबॅक, विरोधकांना डोकेदुखी Special Report
Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे का ढकलल्या? राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Elon Musk : भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
भविष्यात पैसा 'बिनकामाचा' ठरणार, करंसीचे महत्व शून्य, नोकरी करणेही ऑप्शनल ठरेल; इलॉन मस्कची भविष्यवाणी
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे झोपतो कधी, उठतो कधी हा विरोधकांना प्रश्न पडतो, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत अडीच तासापेक्षा जास्त झोपलो नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
VIP Number Plate : HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव, व्हीआयपी नंबर कोणाला मिळणार?
HR88B8888 नंबरप्लेटसाठी 1.17 कोटी रुपयांची बोली लावली पण एक ट्विस्ट, आता पुन्हा लिलाव कारण...
एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..
एड्सच्या साथीचे सिंहावलोकन करताना..
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
नाकात नथणी, गळ्यात काँग्रेसचा गमछा; शेवटच्या दिवशी गौतमी पाटील उतरली प्रचारात, उंचावला 'हात'
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Video महिला खासदारानं पाळीव कुत्र्याला कारमधून आणलं थेट संसद परिसरात; चावतंय का विचारताच दिलेल्या उत्तरानं भाजपचा संताप
Embed widget