एक्स्प्लोर

मोठी बातमी! मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित, मठाधिपतींकडून 5 व्या दिवशी ज्यूस प्यायले; पुढील रणनिती काय?

Manoj Jarange: नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्या हस्ते ते उपोषण सोडत आहेत. तब्येत ढासळल्याने घेण्यात आला निर्णय

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती.

खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही

यावेळी बोलताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगेंनी पुढे म्हटलं आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे. 

 

रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही, मला सलाईन लावले

सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो. रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले. सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे. तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल असेही जरांगे (Manoj Jarange) पुढे म्हणालेत.

पडून राहण्यापेक्षा निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी

या ठिकाणी पडून राहण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केलेली बरी. सरकारचा ज्या सत्तेत आणि खुर्चीत जीव आहे, त्यांच्यासाठीच्या तयारीला आपण लागलं पाहिजे. सभा, कार्यक्रम, निवडणुका, दौरे, कोणाला निवडून आणायचंं कोणाला पाडायचं, कोणते आमदार विरोधात बोलत आहेत, कोणते खासदार विरोधात बोलत आहोेत त्यांचा बंदोबस्त लावणे गरजेचे आहे, एकच सांगतो मराठा समाजाला कधीही भाजप सत्तेवर येऊ देऊ नका. म्हणून इथं उपचार घेत उपोषण करण्यापेक्षा एक दोन दिवस उपचार घेऊन तयारीला लागणार आहे. आज दुपारी बारा वाजता मी उपोषण स्थगित करणार आहे, अशी माहिती जरांगेंनी (Manoj Jarange) माध्यमांशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा:

मोठी बातमी: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार, कारणही सांगितलं, म्हणाले....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं,  बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
पुण्यात बिर्याणी चोर! भूक भागवण्यासाठी मुळशीतलं प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल फोडलं, बिर्याणी तर मिळाली नाही, मग..
Embed widget