एक्स्प्लोर

Jalgaon Train Accident : यंत्रणा, डॉक्टरांची टीमही पोहोचली, जळगाव दुर्घटनेबाबत गिरीश महाजन यांनी दिली महत्त्वाची माहिती!

Maharashtra Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्यानं अनेक प्रवासी समोर येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत.

Jalgaon  Train Accident : जळगाव जिल्ह्यात पुष्पक एक्स्प्रेसला (Pushpak Train Accident) मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्यानं काही प्रवाशांनी रेल्वेखाली उडी घेतली. त्याच वेळी अनेक प्रवासी समोरून येणाऱ्या बंगळुरू रेल्वेखाली गेल्यानं अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर वेगाने बचावकार्य करण्यात येत असून मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण 10 ते 12 जणांचा मृ्त्यू झाल्याचे म्हटले जात आहे. तर या दुर्घटनेत एकूण 40 जण जखमी झाले आहेत.

गिरीश महाजन घटनास्थळी रवाना

या दुर्घटनेबाबत माहिती देणार फोन मला आला. त्यानंतर सर्व कामे सोडून मी जळगाजळगाव :वला निघालो आहे. अगदी दोन ते तीन मिनिटांत मी घटनास्थळावर पोहोचणार आहे. तत्पुर्वी 10 ते 12 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. घटनास्थळावर गेल्यानंतरच मला तिथं नेमकं काय घडलं, हे समजू शकेल, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

डॉक्टरांची टीम पोहोचली, बचावकार्य चालू

ही घटना अतिशय दुर्घटना आहे. समोरून गाडी येत होती आणि लोकांनी उडी मारल्यामुळे लोक या गाडी खाली आले, असं सांगितलं जात आहे. पण नेमकं काय घडलंय, हे तिथं गेल्यावरच समजेल. आमचे कार्यकर्ते आता घटनास्थळी गेले आहेत. या दुर्घटनेच्या ठिकाणी पाचोरा हे ठिकाण जवळ आहे. त्यामुळे जखमींना याच भागातील रुग्णालयाच नेण्याचं काम चालू आहे. डॉक्टरांची टीम तिथे आलेली आहे. चार ते पाच लोकांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे. 

फडणवीसांनी व्यक्त केलं दु:ख

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दु:ख व्यक्त केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या. 

आठ रुग्णवाहिका रवाना

तसेच, माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपात्कालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. 

हेही वाचा :

Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget