एक्स्प्लोर

पायी वारीचा प्रस्ताव शासनानं मंजुर करायला हवा होता; एकनाथ खडसेंनी घेतली वारकऱ्यांची बाजू

जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थांच्या वतीने दर वर्षी संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते यामध्ये हजारो दिंड्या पालख्या आणि वारकरी मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थांच्या वतीने दर वर्षी संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असते यामध्ये हजारो दिंड्या पालख्या आणि वारकरी मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात. मात्र गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीवर बंधन आले असून त्याऐवजी मोजक्याच  वारकऱ्यांच्या सह ही वारी बसमधून पंढरपूरकडे रवाना केली जात आहे. 

यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वारीला पायी जाण्यास परवानगी न मिळाल्याने वारकऱ्यांच्या मध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी या गावी असलेल्या संत मुक्ताबाई समाधी स्थळवरून संत मुक्ताबाईंची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना होत असते अतिशय मानाच्या असलेल्या या पालखीचा साडेसातशे किलोमीटर चा प्रवास 34 दिवसांत पूर्ण होत असतो.  या काळात ही अनेक गावात मुक्काम करीत जात असल्याची आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या कडून मुक्ताई पादुकांच दर्शन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही मुक्ताई पालखीला पायी जाण्यास परवानगी मिळाली नसली तरी वारीला खंड पडू नये म्हणून शंभर वारकऱ्यांच्या मध्ये बसणेही वारी नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता सर्व पातळ्यांवर नियम शिथिल केले गेले असल्याने पायी वारीला ही परवानगी मिळेल अशी शक्यता वर्तविली जात असताना अशा प्रकारची परवानगी न मिळाल्याने, गाव पातळीवर मुक्ताई पादुकांचं दर्शन घेता येणार नसल्याने  वारकऱ्यांच्या मध्ये  नाराजी असल्याचं पाहायला मिळाले होते. 

PHOTO : विठुरायाच्या गाभाऱ्यात मोगऱ्याचा बहर; मोहिनी एकादशीनिमित्त आकर्षक सजावट

बसने कमी लोकांत परवानगी दिली जाते तशी पायी जाताना सुद्धा कमी लोकांमध्ये शासनाने परवानगी द्यायला हवी होती, अशी मागणी वारकऱ्यांची होती असा प्रस्ताव ही वारकऱ्यांच्या वतीने शासनास देण्यात आला होता मात्र त्यास परवानगी मिळाली नाही. मुक्ताई नगर येथून निघणाऱ्या संत मुक्ताबाई वारीची अनेक वर्षांची परंपरा पाहता आणि वारकऱ्यांची मागणी पाहता वारकऱ्यांच्या हा प्रस्ताव शासनाने मंजूर केला असता तर अधिक बरे झाले असते असं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी वारकऱ्यांची बाजू घेतली असल्याचं पाहायला पाहायला मिळाले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संत मुक्ताई पालखी सोहळा पायी वारीला परवानगी मिळालेली नसली, तरी कमी वारकऱ्यांमध्ये ती आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे, त्याबाबत आम्ही शासन निर्णयाची वाट पाहत आहोत, वारकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न असल्याने ही परवानगी मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. मात्र तरीही या बाबत शासन जो निर्णय घेईल त्या नुसार आम्ही त्याच पालन करू अस सांगत मुक्ताई नगर देवस्थान चे पुजारी हभप रवींद्र महाराज हरणे यांनी म्हटलं. परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करून उद्या तिथी प्रमाणे ही वारी निघणार असल्याची माहिती निघणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
Embed widget