एक्स्प्लोर

तेलंगणात सापडलेल्या 10 कोटींचं नागपूर कनेक्शन, आयकर विभागाचे छापे

ही रक्कम नागपूरच्या मस्कासाथ परिसरातून आणल्याचं कारचालकाने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे.

नागपूर : नागपुरातील मस्कासाथ परिसरात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका इमारतीत गेल्या दोन दिवसांपासून गोपनीय चौकशी सुरु केली आहे. तिथे अनेक खासगी लॉकर्स असल्याचं आयकर विभागाच्या लक्षात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील पिंपरेवाडा टोल नाक्याजवळ तेलंगणा पोलिसांनी 19 ऑक्टोबर रोजी एका गाडीतून 10 कोटी रुपये जप्त केले होते. तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सीमेवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी करत होते. त्या दरम्यान केए46 एम 6095 या क्रमांकाच्या ब्रीझा कारमध्ये पाच पोत्यांमध्ये भरलेले 10 कोटी रुपये पोलिसांना सापडले होते. ही रक्कम नागपूरच्या मस्कासाथ परिसरातून आणल्याचं कारचालकाने पोलिसांना सांगितलं होतं. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आयकर अधिकाऱ्यांनी मस्कासाथ परिसरात एका इमारतीवर लक्ष केंद्रीत करत चौकशी सुरु केली होती. अत्यंत गुप्तरित्या सुरु असलेल्या या चौकशीमध्ये आयकर अधिकाऱ्यांना मस्कासाथ परिसरातल्या त्या इमारतीत एक नव्हे तर अनेक लॉकर्स सापडल्याची माहिती आहे. त्यामुळे या इमरतीतून अनेक व्यापाऱ्यांसाठी खाजगी लॉकर सेवा तर पुरविली जात नव्हती ना, याची चौकशी आयकर विभाग करत आहे. तसंच या खाजगी लॉकर्समध्ये कोणकोणत्या व्यापाऱ्यांचे, नेत्यांचे घबाड लपवले आहे का याची चौकशीही आयकर अधिकारी करत आहेत. या इमारतीशिवाय नागपुरातील कळमना, सतरंजीपुरा आणि रामदासपेठ परिसरात ही प्रत्येकी एका ठिकाणी चौकशीचे काम सुरु असल्याचे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: 300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
300 कोटींच्या टेंडरचे आमिष, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी अन् राजमुद्रेचा वापर; कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डरद्वारे व्यावसायिकाला 35 लाखांचा गंडा
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Nag Panchami 2026: नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
नागपंचमीला पूजा केल्याने 'कालसर्प दोष' खरंच दूर होतो? ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पौराणिक कथा कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व...
Embed widget