ICSE ISC Result 2023 : आयसीएसई आणि आयएससी परीक्षेत महाराष्ट्राच्या मुलींचा डंका, यंदाही झाली मुलींची सरशी
ICSE ISC Result 2023 : केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई आणि आयएससी परीक्षांचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. तर दोन्ही बोर्डात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत.
ICSE ISC Result 2023 : कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स, (सीआयसीएसई) (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयसीएसई (दहावी) बोर्डाचा निकाल हा 98.94 टक्के लागला आहे. तर आयएससी (बारावी) बोर्डाचा निकाल 96.93 टक्के लागला आहे.विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org आणि results.cisce.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.
महाराष्ट्राच्या मुली अव्वल
आयएससी बारावी बोर्ड परीक्षेत देशातून 5 विद्यार्थी पहिल्या रँकवर आले आहेत. तर दहावी बोर्ड परीक्षेत 9 विद्यार्थी पहिल्या रँक वर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी सरशी केली आहे. दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून ठाण्याच्या सुलोचनदेवी सिंघानिया शाळेची इप्शिता भट्टाचार्य दहावी बोर्ड परीक्षेत देशात पहिली आली आहे. तर बारावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्रातून मुंबईच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेची विद्यार्थिनी श्रेया उपाध्ये देशात पहिली आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेत एकूण 98.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या परीक्षेत एकूण 96.93 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.आयसीएसई (दहावी) बोर्डात 99.21 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 98.71 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत. आयएससी (बारावी) बोर्डामध्ये देखील मुलींची सरशी झाली आहे. बारावीत 98.01टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 95.96 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
असा पाहा निकाल
स्टेप 1 : सर्वप्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cisce.org वर जा.
स्टेप 2: होम पेजवर, 'ICSE किंवा ISC कोर्स' निवडा.
स्टेप 3: आता इंडेक्स नंबर, UID आणि कॅप्चा कोड सारखी लॉगिन क्रेडेन्शियल्स एन्टर करा.
स्टेप 4: तुमचा 'ICSE वर्ग दहावी निकाल 2023' किंवा 'ISC वर्ग बारावी निकाल 2023' स्क्रीनवर उघडेल.
स्टेप 5: ते तपासा आणि निकाल डाऊनलोड करा.
स्टेप 6: विद्यार्थी निकालाची डिजिटल मार्कशीट डाऊनलोड करु शकतात आणि प्रिंटआऊट घेऊ शकतात
जर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत काही आक्षेप असल्यास ते पुन्हा तपासणीसाठी अर्ज करु शकतात. ही सुविधा आज दुपारी 3 वाजता सुरु होईल आणि 21 मे पर्यंत उपलब्ध राहिल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (दहावी) (ICSE)आणि आयएससी (बारावी) (ISC) च्या मार्च आणि फेब्रुवारी महिन्यांत घेण्यात आल्या होत्या. आज त्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI