(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Bhatghar dam news : भाटघर धरणात बापलेकीच्या मृत्यूला कारण ठरलेल्या अनधिकृत रिसॉर्ट मालकाला पोलीस वाचवत आहेत का?
पुणे जिल्ह्यातील सीमा रिसॉर्ट जवळ भाटघर धरणात बुडून पुण्यातील बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या रिसॉर्टमध्ये अनधिकृतरित्या कृत्रिम धबधबा बांधण्यात आल्याचं दिसून येत आहे.
पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील भाटघर धरणात (Bhatghar Dam) बुडून पुण्यातील बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय 13 वर्षे) आणि शिरीष धर्माधिकारी (वय 45 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या बापलेकांची नावं आहे. दोघेही भोरमधील सीमा फार्म्स या रिसॉर्टवर पर्यटनासाठी गेले असता हा प्रकार घडला आहे. याच धबधब्यात खेळताना या दोघांचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या रिसॉर्ट मालकावर कारवाई करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भोर जवळील सीमा रिसॉर्ट हे भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधण्यात आल्याचं दिसून येत आहे. याच सीमा रिसॉर्ट रिसॉर्टमध्ये कृत्रिम धबधबा बांधण्यात आला आहे. या रिसॉर्टवर अनेक पर्यटक वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र हाच धबधबा मृत्यूला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. कारण या धबधब्याचा शेवट थेट भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असल्याने धबधब्याचा शेवट नेमका कुठे होतो आणि धरणाचं क्षेत्र नेमकं कुठून सुरु होतं, याचा अंदाज येणं कठीण आहे. त्यामुळे हा धबधबा पर्यटकांसाठी धोकादायक ठरु शकतो.
रिसॉर्ट मालकाला पोलीस वाचवत आहेत का?
याच सीमा रिसॉर्टमध्ये बापलेकाचा दुर्दैवी जीव गेला आहे. मात्र या 12 तास होऊनही कोणती चौकशी किंवा कारवाई करण्यात आली नाही आहे. संचिन मुंगळे यांचं हे सीमा रिसॉर्ट असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी विचारलं असता. संपूर्ण प्रकरण पाहून पाटबंधारे विभागाकडून अभिप्राय मागवला असल्याचं उपाधीक्षक तानाजी बर्डे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे. अभिप्राय आला की योग्य ती कारवाई करणार असल्याचं देखील ते म्हणाले. मात्र 12 उलटूनही रिसॉर्ट मालकावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. पाणलोट क्षेत्रात रिसॉर्टचं बांधकाम करणं अनधिकृत आहे. असं असूनही कारवाई न झाल्यानं पोलीस रिसॉर्ट मालकावर कारवाई न करुन त्याला वाचवत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकं काय घडलं?
सलग सुट्ट्या असल्याने बालेवाडीत राहणारे फालक आणि धर्माधिकारी कुटुंब 15 ऑगस्ट रोजी भोर तालुक्यातील जयतपाड गावातील सीमा रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. काल दुपारी चारच्या सुमारास सर्व जण सीमा फार्म हाऊच्या मागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅक वॉटर पाहायला गेले. त्यावेळी शिरीष धर्माधिकारी हे बेबी पूल पाहण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी मुलगी ऐश्वर्यालाही बोलावून घेतलं. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र खोल पाण्यात पोहत असताना दोघेही बुडाले.
View this post on Instagram
संबंधित बातमी-
Pune News : पुण्यातील भाटघर धरणात वडील-मुलगी बुडाले; मुलीचा मृत्यू, वडिलांचा शोध सुरु