Majha Katta : कर्करोग समूळ बरा होतो का? अतुल परचुरेंवर उपचार करणाऱ्या डॉ. देशपांडेंनी 'माझा कट्टा'वर काय सांगितलं?
Atul Parchure : अभिनेते अतुल परचुरे यांनी त्यांचा कर्करोगाचा प्रवास माझा कट्ट्यावर उलगडला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. शैलेश देशपांडे यांनीदेखील संवाद साधला.
मुंबई : 'कर्करोगाविषयी (Cancer) बोलताना डॉ. शैलेश देशपांडे यांनी होमिओपॅथीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या गोष्टी माझा कट्ट्यावर (Majha Katta) सांगितल्या. कर्करोग ही एक प्रवृत्ती आहे आणि ठरवलं तर ती नक्कीच बदलू शकते', असं डॉ. शैलेश देशपांडे म्हणाले. त्यांच्या इतक्या वर्षाच्या अनुभवाचं विश्लेषण त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये 'माझा कट्ट्या'वर केलं.
कर्करोगाशी लढा देतानाच्या प्रवासाविषयी अभिनेते अतुल परचुरे यांनी बरेच अनुभव 'माझा कट्ट्या'वर सांगितले. त्यांचा या प्रवासात त्यांनी अनेक चढउतार पाहिले. त्यांना यामध्ये मोलाची साथ लाभली ती डॉ. शैलेश देशपांडे यांची. डॉ.शैलेश देशपांडे यांनी शरद पोंक्षे यांसारख्या अनेक दिग्गजांना या संकटात बाहेर पडण्यास मदत केली आहे. डॉ.शैलेश देशपांडे हे होमिओपॅथीक आहेत. त्यांच्या होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आजारातून सावरण्यास मदत झाल्याचं अतुल परचुरे यांनी माझा कट्ट्यावर सांगितलं.
काय म्हणाले अतुल परचुरे?
'डॉ.शैलेश देशपांडे यांनी सुरुवातीपासूनच मला एक आशेचा किरण दिला. कारण मी दोन महिन्यांपासून यावर उपचार घेत होतो पण प्रत्येकजण मला हेच सांगत होता, की हे कठीण आहे, कसं होईल. पण देशपांडेंनी माझे रिपोर्ट्स पाहिले आणि त्यांनी म्हटलं की, हे फार किरकोळ आहे बरं होऊन जाईल. जे मला प्रतिष्ठित रुग्णालयातील डॉक्टरांनी अडीच महिन्यांत एकदाही सांगितलं नाही ते मला शैलेश देशपांडे यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं', असं अतुल परचुरे यांनी म्हटलं.
'लोकं गाव फिरुन झाल्यावर होमिओपॅथीकडे येतात'
'अतुल परचुरे यांची केस माझ्यासाठी खूप क्लिअर केस होती. कारण अडीच महिन्यांनंतरही त्यांच्या रोगावर उपचार सुरु झाले नव्हते. लोकं खरतर सगळं गाव फिरुन झाल्यावर होमिओपॅथीकडे येतात. पण अतुल यांच्या बाबतीत तसं नव्हत. खरतरं कर्करोगावर उपचार करतात, त्याच्यावर केमोथेरेपी करतात, पण ज्याला तो रोग झाला आहे त्याच्यावर कोणीच उपचार करत नाही. हे जास्त भयानक आहे. त्यामुळे मी दुसऱ्या बाजूने जाण्याचा ठरवलं', असं शैलेश देशपांडे यांनी म्हटलं.
पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं, 'त्या छोट्या कर्करोगाच्या गोळ्यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा मी बाकीचं शरीर स्ट्राँग करण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने उपचार करण्यास सुरुवात केली. यामुळे काय होईल, तर जो कर्करोग आहे तो जिथे आहे तिथेच राहिल, तोच परिणाम मला साधायचा होता आणि तोच मी साधला. सुरुवातीला मी त्यांना सांगितलं हा गोळा एक सेंटीमीटर सुद्धा वाढला नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित करा. तुमचं रोजचा दिनक्रम तसाच चालू ठेवा. त्यामुळे त्यावर जवळपास 70 ते 80 टक्के यश मिळवणं सहज शक्य झालं.'
कर्करोग समूळ बरा होता का?
कर्करोग समूळ बरा होता का? या प्रश्नाचं उत्तर देतांना डॉ. देशपांडे यांनी म्हटलं की, 'कर्करोग ही एक प्रवृत्ती आहे. त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर ही प्रवृत्ती नक्कीच बदलली जाऊ शकते. कर्करोग बरा झाला हे सांगण्याचे अनेक निकष आहे आणि प्रत्येक पॅथीला तेच फोलो करावं लागतं. त्यामुळे ती प्रवृत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि ते प्रयत्न केले तर ती प्रवृत्ती नक्कीच नष्ट देखील होते.'
केमो एबोलायजेशन म्हणजे काय?
डॉ.देशपांडे यांनी यावेळी केमो एबोलायजेशन याविषयी माहिती दिली. अतुल परचुरे यांचा कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी केमो एबोलायजेशन कशी मदत झाली याबाबात त्यांनी सांगितलं. यावर बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'तो कर्करोगाचा गोळा पसरणारा नाही याची मी काळजी घेतली आहे. त्यामुळे त्याच्या बाजून जे मी कंपाऊंड घातलं त्याच्या आतमध्ये जाऊन त्या कर्करोगाच्या गोळ्याला मारण्याचं काम हे केमो एबोलायजेशन करणं शक्य झालं. त्यामुळे तो कर्करोग शरीरात पसरण्याची शक्यता देखील कमी होते.'
कॅन्सर हा होमिओपॅथीमुळेच बरा होऊ शकतो का?
पण असा देखील संभ्रम निर्माण होईल की, कर्करोग हा होमिओपॅथीमुळेच बरा होऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ.देशपांडे यांनी म्हटलं की, 'त्यामुळे कोणतीही खोटी आशा द्यायची नाही. अतुल यांच्यासोबत देखील मी जवळपास दीड ते दोन तास चर्चा केली. त्यानंतर मी त्यांना योग्य आणि खरं काय ते सांगितलं. नाण्याची एक बाजू जेव्हा काम करत नाहीये हे जेव्हा मला कळालं तेव्हाच मी त्यांना योग्य काय ते सांगितलं.'
डॉ.देशपांडे यांनी यावेळी केमो एबोलायजेशन याविषयी माहिती दिली. अतुल परचुरे यांचा कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी केमो एबोलायजेशन कशी मदत झाली याबाबात त्यांनी सांगितलं. यावर बोलतांना ते म्हणाले, 'तो कर्करोगाचा गोळा पसरणारा नाही याची मी काळजी घेतली आहे. त्यामुळे त्याच्या बाजून जे मी कंपाऊंड घातलं त्याच्या आतमध्ये जाऊन त्या कर्करोगाच्या गोळ्याला मारण्याचं काम हे केमो एबोलायजेशन करणं शक्य झालं. त्यामुळे तो कर्करोग शरीरात पसरण्याची शक्यता देखील कमी होते.'
होमिओपॅथीमध्ये खरतर शरीराची यंत्रणा सज्ज केली जाते. तुम्हाला जर हा आजार झाला आहे तर त्याच्या सुरुवातीपासून ते तो आजार बरा होण्यापर्यंत शरीर सशक्त करण्याचं काम होमिओपॅथी करतं, असं डॉ. देशपांडे यांनी म्हटलं आहे.