Maharashtra Rain: मुंबई, पुण्यात मान्सूनचा पाऊस आलाच नाही, हवामान खात्याने मात्र घोषणा करुन टाकली; हवामान तज्ज्ञाचा धक्कादायक दावा
Maharashtra Rain: 28 मे नंतर महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात मोठे बदल दिसतील. 30 मे नंतर राज्यातील बहुतांश भागात कोरडे वातावरण असणार आहे. मान्सूनचा मोठा पाऊस 5 जूनपर्यंत महाराष्ट्रात पडणार नाही.

पुणे: मुंबई, पुण्यासह राज्यातील काही भागात दाखल झालेला मान्सून नसून वाळिवाचा पाऊस असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मोसमी वारे दक्षिण मुंबईपर्यंत दाखल मात्र अद्यापही राज्यातील काही भागात मान्सूनचा पाऊस नाही असा तज्ज्ञांचा आक्षेप आहे. मान्सूनपूर्वीच्या तीव्र वादळी ढगांमुळे राज्यातील काही भागात पाऊस झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मान्सूनमध्ये वाऱ्यांची दिशा ही दक्षिण-पश्चिम, मात्र मुंबई आणि पुण्यातील सध्या वाऱ्यांची दिशा ही उत्तर-पश्चिम आहे. 28 मे नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अखाती देशांकडून कोरडे वारे वाहणार असल्याचं स्पष्ट आहे.
हे कोरडे वारे वाहत असताना मोसमी वारे केरळमधून पुढे सरकत असताना वादळी ढग तयार होतात आणि कोरडी हवा मागे ढकलत जातात. अशातच, 28 मे नंतर महाराष्ट्रासह भारतातील अनेक भागात मोठे बदल दिसतील. 30 मे नंतर राज्यातील बहुतांश भागात कोरडे वातावरण असणार आहे. मान्सूनचा मोठा पाऊस 5 जूनपर्यंत महाराष्ट्रात पडणार नाही. सोबतच, तापमानात देखील वाढ होणार असल्याचं देवरस यांनी निरीक्षण नोंदवलं आहे. कोरडी हवा मान्सूनच्या वाऱ्यांना ब्रेक लावणार आणि तो नाॅर्मल टाइम टेबल मान्सूनचा आहे, त्या दृष्टीनं वाटचाल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मान्सून आज संपूर्ण राज्य व्यापणार
मान्सून सोमवारी मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांत दाखल झाल्याने मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस झाला. मंगळवारीही तो त्याच ठिकाणी मुक्कामी होता. बुधवारी तो राज्याचा उर्वरित भाग व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी जूनपर्यंत उघडीप ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण वगळता राज्याच्या इतर भागांत मुसळधारेचा जोर 30 ते 31 मे पासून कमी होणार असल्याचा ताजा अंदाज समोर आला आहे. उद्या, 28 मे पासूनच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चे पावसाचा जोर कमी होत आहे. या 4 भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे घाटांमाथा परिसरामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच बुधवारपासून मुंबई, पालघर भांगातील पाऊस कमी होत आहे. मात्र कोकणातील इतर भागात मुसळधार पाऊस 31 मे पर्यंत राहील.
नैऋत्य मान्सूनची प्रगती
मान्सून सोमवारी मुंबई, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत एकाच वेळी आला आहे. काल (मंगळवारी) तो याच भागात थांबला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांत मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्रातील काही भाग, कर्नाटकातील उर्वरित भाग व्यापणार आहे.






















