एक्स्प्लोर

मोठी बातमी :  इक्बालसिंह चहल यांची बदली, मुख्यमंत्र्यांकडून आता देवेंद्र फडणवीसांच्या खात्याची धुरा

Iqbal Singh Chahal : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले IAS इक्बालसिंह चहल यांची बदली झाली आहे. चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार होता.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जवळचे अधिकारी अशी ओळख असलेले IAS इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची बदली झाली आहे. इक्बालसिंह चहल यांना आता गृह विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. चहल यांच्याकडे सध्या मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार होता. त्यांची बदली होऊन आता ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळतील.

बदलापूरमधील अत्याचार (Badlapur School Case) प्रकरणाने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

इक्बालसिंह चहल यांची बदली

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते. त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नियमानुसार तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एका पदावर, जिल्ह्यात किंवा मूळ गाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या निवडणुकीच्या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. या आदेशानुसार इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आली होती. चहल यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची बदली करण्यात आली आहे. 

गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी नियुक्ती

आता बदलापूरमधील एका शाळेत (Badlapur School Case) 13 ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या हायकोर्टात सुरु असून या पार्श्वभूमीवर इक्बालसिंह चहल यांची बदली (Iqbal Singh Chahal Transfer) करण्यात आली आहे. इक्बालसिंह चहल यांची गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच खनिकर्म विभागाचा अतिरिक्त कार्यभार देखील चहल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केलेली पुण्यातील घटना कोणती, 2 महिन्यात आरोपीला फाशी?; मिलिंद देवरांनी सांगितली स्टोरी

Nana Patole : बदलापूरची शाळा RSS च्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव, CCTV फुटेज गायब; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 8.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 7.00 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget