एक्स्प्लोर

पंढरपुरात धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण, तिघांना रुग्णालयात हलवलं

मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात सलग तारखा देऊन समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 9 आंदोलकांनी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

पंढरपूर : पंढरपूर इथे धनगर आरक्षणासाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणातील अनेकांची प्रकृती ढासळली असून पोलिसांनी बळजबरीने तिघांना उपचारांसाठी रुग्णालयात हलवले आहे. तर इतर उपोषणकर्त्यांनी उपचारांसाठी नकार दिल्याने प्रकृती चिघळू लागली आहे. एकीकडे राज्यातील पूरस्थिती आणि दुसरीकडे आंदोलकांची प्रकृती खालावल्याने फडणवीस सरकारपुढे नवीन संकट उभं राहिलं आहे. दरम्यान या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मराठा समाजाप्रमाणे धनगर आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयात सलग तारखा देऊन समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले द्यावेत, या मागणीसाठी धनगर आरक्षण समन्वय समितीच्या वतीने राज्यातील 9 आंदोलकांनी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी यातील तीन आंदोलकांती प्रकृती खालावली. तर पाचव्या दिवशी चौघांची प्रकृती ढासळल्याने पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केलं. यामुळे समाजात आता संताप वाढू लागला आहे. सरकारच्या वतीने पालकमंत्री विजय देशमुख आणि शिवसेनेचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा करुन भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलं होतं. सध्या सांगली आणि कोल्हापुरातील पूरस्थितीमुळे धनगर आंदोलक शांततेत आंदोलन करत आहेत. मात्र आता जसजसे पुराचे संकट कमी होऊ लागल्यावर पुन्हा हा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप न केल्यास मात्र आंदोलकच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Embed widget