वेस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
वसई आणि विरारच्या नजदीक भारतीय रेल्वे एक अजस्त्र असे निर्माण कार्य करत आहे. हे काम आहे वेस्टन डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोरचे आहे.
ठाणे : भारतीय रेल्वे मालवाहतूकीत अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचा महत्वाचा टप्पा आज पार पडला. दिल्लीच्या दादरीपासून मुंबई नजीक जेएनपीटी पर्यंत उभारण्यात येत असलेल्या वेस्टन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या नॉर्थ टनेलचा ब्रेक थ्रू आज झाला. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा जगातला पहिला डबल स्टेक कंटेनर बोगदा आहे. तर ताशी 100 किमीच्या वेगाने मालगाडी या कॉरिडॉर मधून धावणार आहे.
वसई आणि विरारच्या नजदीक भारतीय रेल्वे एक अजस्त्र असे निर्माण कार्य करत आहे. हे काम आहे वेस्टन डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोरचे आहे. याच डब्ल्यू डी एफ सी बांधकामाचा एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. या कॉरिडॉरमध्ये असलेल्या दोन पैकी एका बोगद्याचे कंट्रोल ब्लास्टिंग करून ब्रेकथ्रू आज करण्यात आले
वैतरणा ते जेएनपीटी वेस्टन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यात हा बोगदा तयार केला जात आहे. हा एकूण 102 किमीचा टप्पा आहे. त्यासाठी टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी त्यांना एक डोंगर अक्षरशः कापून काढावा लागलाय. यातून डबल कंटेनर घेऊन मालगाडी ताशी 100 किमीच्या वेगाने धावणार असल्याने बोगद्याचे बांधकाम उच्च दर्जाचे करम्यात आले आहे. असे अजून एक टनेल याच टप्प्यात आहे त्याचे बांधकाम सुरू आहे, असे या प्रकल्पाचे चीफ जनरल मॅनेजर राजीव त्यागी यांनी सांगितले
वैतरणा ते जेएनपीटी ज्या मुख्य प्रकल्पाचा भाग आहे तो आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. या एका प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे भविष्य बदलणार आहे. कारण हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मालगाड्या वेगळ्या आणि प्रवासी गाड्या वेगळ्या मार्गाने धावू लागतील.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे काय?
साल 2005 मध्ये मनमोहन सिंग आपले पंतप्रधान असताना डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर प्रकल्पाची सुरुवात केली गेली, मात्र त्याला गती खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यापासून मिळाली. फक्त मालगाड्यांसाठी एक वेगळा रेल्वे मार्ग उभारण्यात यावा, जो देशातल्या सर्व बाजूंच्या महत्त्वाच्या शहरांना आणि बंदरांना जोडेल असा विचार या प्रकल्पाच्या मागे होता. 2015 साली या प्रकल्पाच्या निर्माणसाठी तब्बल 81 हजार 459 कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
ज्यात ईस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर असे दोन मोठे प्रकल्प सध्या उभारण्यात येत आहेत.
इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हा 1839 किमीचा रेल्वे मार्ग पंजाब येथील लुधियाना पासून सुरू होऊन पश्चिम बंगालमधील दानकुनी पर्यंत जाणार आहे. तर वेस्टन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हा 1504 किमीचा रेल्वे मार्ग दिल्ली नजीक दादरी पासून मुंबई पर्यंत उभारण्यात येत आहे.
यापैकी इस्टर्न डी एफ सी चे 72 टक्के आणि वेस्टन डी एफ सी चे 71 टक्के काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही प्रकल्पातील तीन सेक्शन चे काम पूर्ण होऊन त्यावर मालगाड्या धावू लागल्या आहेत.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात आतापर्यंत मालगाड्या आणि प्रवासी गाड्या एकाच मार्गावरून धावत असल्याने दोन्ही प्रकारच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. मात्र डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरवर मालगाड्या तब्बल शंभर किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकणार आहेत. तर एकाच वेळी 13000 टन मालाची वाहतूक करता येणार आहे. यामुळे देशातील माल वाहतुकीला प्रचंड गती प्राप्त होईल. उद्योगधंद्यांमध्ये वाढ होईल. देशाची आयात निर्यात वाढेल, याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील ट्रक आणि कंटेनरची अवजड वाहतूक कमी होईल. त्यामुळे एका अंदाजानुसार तब्बल 45 करोड टन कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन कमी होणार आहे. त्याचा प्रदूषण कमी होण्यास फायदा होईल, तसेच प्रवाशांना देखील त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ जी राजधानी एक्सप्रेस आज 12 ते 14 तासात दिल्लीला पोस्ट ची राजधानी केवळ दहा तासात किंवा त्याही पेक्षा कमी वेळेत दिल्लीला पोहोचेल.
दोन्ही कॉरिडॉरच्या निर्माणासाठी प्रति किलोमीटर 18 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. वर्ल्ड बँक, जपानची जायका अशा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यासाठी आर्थिक मदत घेतली गेली आहे. या दोन्ही कॉरिडॉरसाठी 2022 ची डेडलाईन आहे. मात्र 2023 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आणखी चार कॉरीडोर निर्माण करण्यात येणार आहेत, ज्याच्या डीपीआरचे काम सध्या सुरू आहे. याच डब्ल्यू डी एफ सी बांधकामाचा एक महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. या कॉरिडॉरमध्ये असलेल्या दोन पैकी एका बोगद्याचे कंट्रोल ब्लास्टिंग करून ब्रेकथ्रू आज करण्यात आले
वैतरणा ते जेएनपीटी वेस्टन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यात हा बोगदा तयार केला जात आहे. हा एकूण 102 किमीचा टप्पा आहे. त्यासाठी टाटा प्रोजेक्ट्स या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी त्यांना एक डोंगर अक्षरशः कापून काढावा लागलाय. यातून डबल कंटेनर घेऊन मालगाडी ताशी 100 किमीच्या वेगाने धावणार असल्याने बोगद्याचे बांधकाम उच्च दर्जाचे करम्यात आले आहे. असे अजून एक टनेल याच टप्प्यात आहे त्याचे बांधकाम सुरू आहे, असे या प्रकल्पाचे चीफ जनरल मॅनेजर राजीव त्यागी यांनी सांगितले
वैतरणा ते जेएनपीटी ज्या मुख्य प्रकल्पाचा भाग आहे तो आहे वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर. या एका प्रकल्पामुळे भारतीय रेल्वेचे भविष्य बदलणार आहे. कारण हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मालगाड्या वेगळ्या आणि प्रवासी गाड्या वेगळ्या मार्गाने धावू लागतील.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर म्हणजे काय?
साल 2005 मध्ये मनमोहन सिंग आपले पंतप्रधान असताना डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर प्रकल्पाची सुरुवात केली गेली, मात्र त्याला गती खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्यापासून मिळाली. फक्त मालगाड्यांसाठी एक वेगळा रेल्वे मार्ग उभारण्यात यावा, जो देशातल्या सर्व बाजूंच्या महत्त्वाच्या शहरांना आणि बंदरांना जोडेल असा विचार या प्रकल्पाच्या मागे होता. 2015 साली या प्रकल्पाच्या निर्माणसाठी तब्बल 81 हजार 459 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. ज्यात ईस्टर्न डेडिकेटेड फ्रंट कॉरिडोर आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर असे दोन मोठे प्रकल्प सध्या उभारण्यात येत आहेत.
इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हा 1839 किमीचा रेल्वे मार्ग पंजाब येथील लुधियाना पासून सुरू होऊन पश्चिम बंगालमधील दानकुनी पर्यंत जाणार आहे. तर वेस्टन डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हा 1504 किमीचा रेल्वे मार्ग दिल्ली नजीक दादरी पासून मुंबई पर्यंत उभारण्यात येत आहे. यापैकी इस्टर्न डी एफ सी चे 72 टक्के आणि वेस्टन डी एफ सी चे 71 टक्के काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही प्रकल्पातील तीन सेक्शन चे काम पूर्ण होऊन त्यावर मालगाड्या धावू लागल्या आहेत.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात आतापर्यंत मालगाड्या आणि प्रवासी गाड्या एकाच मार्गावरून धावत असल्याने दोन्ही प्रकारच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. मात्र डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरवर मालगाड्या तब्बल शंभर किमी प्रति तास या वेगाने जाऊ शकणार आहेत. तर एकाच वेळी 13000 टन मालाची वाहतूक करता येणार आहे. यामुळे देशातील माल वाहतुकीला प्रचंड गती प्राप्त होईल. उद्योगधंद्यांमध्ये वाढ होईल. देशाची आयात निर्यात वाढेल, याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील ट्रक आणि कंटेनरची अवजड वाहतूक कमी होईल. त्यामुळे एका अंदाजानुसार तब्बल 45 करोड टन कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन कमी होणार आहे. त्याचा प्रदूषण कमी होण्यास फायदा होईल, तसेच प्रवाशांना देखील त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. उदाहरणार्थ जी राजधानी एक्सप्रेस आज 12 ते 14 तासात दिल्लीला पोस्ट ची राजधानी केवळ दहा तासात किंवा त्याही पेक्षा कमी वेळेत दिल्लीला पोहोचेल.
दोन्ही कॉरिडॉरच्या निर्माणासाठी प्रति किलोमीटर 18 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. वर्ल्ड बँक, जपानची जायका अशा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून त्यासाठी आर्थिक मदत घेतली गेली आहे. या दोन्ही कॉरिडॉरसाठी 2022 ची डेडलाईन आहे. मात्र 2023 पर्यंत हे प्रकल्प पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे आणखी चार कॉरीडोर निर्माण करण्यात येणार आहेत, ज्याच्या डीपीआरचे काम सध्या सुरू आहे.