एक्स्प्लोर
भारताला हिंदू राष्ट्र कधीच होऊ देणार नाही : ओवेसी

लातूर : धर्मनिरपेक्ष असलेल्या हिंदुस्थानला मी कधीही हिंदू राष्ट्र बून देणार नाही. काँग्रेसचं सेक्युलर तर भाजपचं राष्ट्रवादाचं दुकान मी बंद करणार, असा घणाघात एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. लातूरमध्ये आयोजित सभेत ओवेसी बोलत होते. लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएम, महाराष्ट्र विकास आघाडी, शेतकरी संघटना यांनी एकत्र येत परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. भारतात हजारो जाती धर्माचे लोक राहतात. भारतासारखं राष्ट्र जगात कुठेही मिळणार नाही. त्यामुळे भारताला एका धर्माचं राष्ट्र कधीच होऊ देणार नाही, असं म्हणत ओवेसींनी भाजपवर निशाणा साधला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























