7th July In History: भारतातील पहिला चलचित्रपट प्रदर्शित, मुंबईत पहिली सूत गिरण सुरू, महेंद्रसिंह धोनीचा जन्म; आज इतिहासात
7th July Important Events: आजच्याच दिवशी उद्योगपती कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली सूत गिरण सुरुवात करण्यात आली.
7th July In History: इतिहासात आजच्या दिवशी 7 जुलै रोजी झारखंडची राजधानी रांची येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आपल्या क्षमतेने आणि लढाऊ भावनेने जागतिक क्रिकेटमध्ये एक वेगळे स्थान प्राप्त केले. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन त्याला पद्मभूषण, पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. माही या नावाने प्रसिद्ध असलेला धोनी हा तीनही आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 7 जुलैला विशेष महत्त्व आहे. 1896 मध्ये या दिवशी फ्रेंच सिनेमॅटोग्राफर ल्युमियर बंधूंनी (Lumiere Brothers) भारतीय सिनेमाचा पाया (Birth of Indian Cinema) घातला. या दोघांनी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये या दिवशी सहा चलचित्रपट दाखवले. हे चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाची किंमत तेव्हा एक रुपया ठेवण्यात आली होती आणि त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी याला शतकाचा चमत्कार म्हटले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, ज्याने लवकरच कोलकाता आणि चेन्नई येथील चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम केला आणि भारतीय चित्रपट निर्मितीचा मार्ग मोकळा केला.
1656 : शिखांचे आठवे गुरु हर किशन यांचा जन्म.
1758 : आधुनिक त्रावणकोरचे निर्माते राजा मार्तंड वर्मा यांचे निधन.
1854 : मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू
7 जुलै 1854 साली उद्योगपती कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी ( First Cotton Mill) सुरू केली. दि बॉम्बे स्पिनिंग ॲन्ड विव्हिंग मिल (Bombay Spinning and Weaving Company) ही ब्रिटिश भारतातील पहिली कापडगिरणी मुंबईतील ताडदेव येथे स्थापन करण्यात आली. त्यानंतर मुंबईत कापड गिरण्यांची वाढ होत गेली.
1896: भारतात ल्युमियर बंधूंनी पहिला चित्रपट दाखवला
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात 7 जुलैला विशेष महत्त्व आहे. 1896 मध्ये या दिवशी फ्रेंच सिनेमॅटोग्राफर ल्युमियर बंधूंनी (Lumiere Brothers) भारतीय सिनेमाचा पाया घातला. या दोघांनी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये या दिवशी सहा चलचित्रपट दाखवले. हे चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाची किंमत तेव्हा एक रुपया ठेवण्यात आली होती आणि त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी याला शतकाचा चमत्कार म्हटले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला, ज्याने लवकरच कोलकाता आणि चेन्नई येथील चित्रपटांच्या प्रदर्शनावर परिणाम केला आणि भारतीय चित्रपट निर्मितीचा मार्ग मोकळा केला.
1910 : भारत इतिहास मंडळाची स्थापना
1910 : 7 जुलै 1910 रोजी पुण्यात भारत इतिहास मंडळाची स्थापना झाली. वि. का. राजवाडे आणि खं. चिं. मेहंदळे यांनी या संस्थेची स्थापना केली. मराठेशाहीच्या इतिहासाचे संशोधन करणारी ही भारतातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे.
1930: ब्रिटिश लेखक आर्थर कॉनन डॉयल यांचे निधन.
1948: बहुउद्देशीय प्रकल्पासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना.
1973 : कैलास खेर यांचा जन्मदिन
कैलास खेर (Kailash Kher) यांचा जन्म 7 जुलै 1973 साली उत्तर प्रदेशमध्ये झाला. कैलास खेर हे भारतीय गायक, गीतकार आणि दिग्दर्शक आहेत. त्यांना पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.
1978: सॉलोमन बेटांनी युनायटेड किंगडमपासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
1981: महेंद्रसिंह धोनीचा जन्म
सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) अर्थात माहीचा जन्म 7 जुलै 1981 रोजी रांची येथे झाला. 2007 ते 2017 पर्यंत मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आणि 2008 ते 2014 पर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता. क्रिकेटच्या इतिहासातील एक महान कर्णधार, यष्टिरक्षक-फलंदाज आणि फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे. कॅप्टन कूल असंही त्याला ओळखलं जातं. तो इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार देखील आहे.
धोनीला 2008 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला. आणि भारत सरकारने 2009 मध्ये त्याला पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले. धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने क्रिकेट विश्वचषक, ICC T20 विश्वचषक आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी या तिन्ही स्पर्धा जिंकल्या आहेत. धोनीला भारतीय सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलची मानद रँक आहे.
1985: बोरिस बेकरने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी विम्बल्डन जिंकले
1999: परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा शहीद
कॅप्टन विक्रम बत्रा (Vikram Batra) हे कारगिल युद्धात (Kargil War) आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै 1999 रोजी शहीद झाले. विक्रम बत्रा यांनी कारगिल युद्धात अभूतपूर्व शौर्य दाखवलं. त्यांच्या कामगिरीचा गौरव करताना त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.