एक्स्प्लोर

Panjabrao Deshmukh : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात मोलाचं योगदान 

भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांची आज जयंती आहे. शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे.

Panjabrao Deshmukh : भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) यांची आज (27 डिसेंबर) जयंती आहे. 27 डिसेंबर 1898 रोजी अमरावती (Amravati) जिल्ह्यातील पापड गावात शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. कृषी आणि शैक्षणिक क्षेत्रात पंजाबराव देशमुख यांचं मोठं कार्य आहे. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करुन शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं.

1920 ला शिक्षणासाठी परदेशात

पापड गावात तिसरीपर्यंत शाळा होती. नंतर चान्दुरातील शाळेतून पंजाबराव देशमुख यांनी चौथीचं शिक्षण घेतलं. पुढील शिक्षण कारंजा लाड येथे झाले. असे अनेक अडचणींना तोंड देऊन 1918 ला ते दहावी उच्च श्रेणीत पास झाले. 1918 साली 25 जूनला त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन  कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी आपल्याला इंग्लंडला जायचे असे त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते. इंग्रजीतून भाषण व लेखन करण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. परदेशात शिक्षण करण्यासाठी पैशांची गरज होती. यावेळी पैशासाठी पंजाबरावांचे वडील शामराव यांनी त्यांची संपूर्ण शेती गहाण टाकून पैसा उभा केला. 21 ऑगस्ट 1920 रोजी पंजाबराव देशमुख  बोटीने इंग्लंडला पोचले. अत्यंत खडतर जीवन जगत पंजाबरावांनी अभ्यास करून उच्च शिक्षण पूर्ण केलं. 1926 मध्ये ते भारतात परत आले.

 1931 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना

पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषीमंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी 1931 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे एक हजाराच्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 1950 मध्ये सार्वजनिक विद्यापीठाची स्थापना केली. त्याच वर्षी पंजाबराव देशमुखांनी सात महाविद्यालये स्थापन केली आणि अमेरिकेत स्थलांतरित झाले.

भारताच्या कृषी क्रांतीचे प्रणेते 

शेतकरी नेते अनेक आहेत, पण शेतकऱ्याचे अश्रू पुसणारे आणि त्याची व्यथा समजून घेणारे मोजकेच आहेत. पंजाबराव देशमुख हे शोषितांचे, शेतकऱ्यांचे तारणहार होते. ते 1952 ते 1962 या काळात भारताचे कृषीमंत्री होते. त्यांनी या काळात कृषी आणि शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी काम केलं. पंजाबी शेतकरी भाऊसाहेबांचा उल्लेख 'पंजाबराव पंजाब' असा करू लागले. त्यांनी 1955 मध्ये 'भारत कृषक समाज' ची स्थापना केली. डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इतरांनी 1959 मध्ये दिल्लीत 'जागतिक कृषी प्रदर्शना' ला हजेरी लावली. ते राष्ट्रीय कृषीसह अनेक संस्थांचे संस्थापक आणि अध्यक्ष होते.

पंजाबराव देशमुखांचे कार्य

1) 1927 - शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालवले.

2) वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.

3) 1933 - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारीत करण्यात मोठा वाटा आहे. त्यामुळं त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.

4) 1926 - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.

5) 1927 - शेतकरी संघाची स्थापना.

6) 1932 -  ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.

7) - ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.

8) 1950 - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.

9) 1955 - भारत कृषक समाजाची स्थापना, त्याच्याच विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.

10) 1656 - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.

11) 18 ऑगस्ट 1928 - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .

12) 1930 - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री

13) 1952, 1657, 1962 असे तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले.

14) 1952 ते 1962 केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.

15) देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने 1932 मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.

16) प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.

17) 1960 - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : कोकाटेंच्या शिक्षेवरुन दावनेंचा सवाल, गदारोळ होताच फडणवीस उठले अन्...Vidhan Parishad Rada : विधान परिषद सुरु होताच पहिल्याच मिनिटात राडा, पाहा UNCUT VIDEOKaruna Sharma: Dhananjay Munde यांच्या प्रेशरमुळे अजितदादा राजीनामा जाहीर करत नाही : करुणा शर्माVidhanbhavan Nana Patole PC | राज्यात लाडक्या बहिणी असुरक्षित, नाना पटोलेंची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच... 
Dhananjay Munde: मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात धाव; कोर्टाच्या अंतरिम आदेशाला आव्हान देणार,नेमकं प्रकरण काय?
Sangli News : कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
कर्जाचा डोंगर, उसनवारीचा पैसा फेडण्याचे टेन्शन, विम्याच्या पैशावर वळली नजर; बायकोने मुलाच्या मदतीने थेट नवऱ्याला संपवलं, पहिल्यांदा रचला अपघाताचा बनाव!
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Video: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत करुणा शर्मांची अंदर की बात; राष्ट्रवादीत गेल्यानेच माझ्या पतीचं वाटोळं झालं
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात ट्विस्ट, आता शिंदेसेनेच्या महिला पोलीस अधीक्षकांच्या भेटीला, नेमकी मागणी काय?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार का? नार्वेकरांच्या दालनात फडणवीस-अजितदादांसोबत बंद दाराआड चर्चा
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
इंद्रजीत सावंत यु-ट्यूबमधून चुकीची माहिती पसरवतात; करनी सेनेचा आरोप, पोलिसात तक्रार
Abu Azmi: औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के अन् बॉर्डर अफगाणिस्तानापर्यंत पसरली होती: अबू आझमी
Embed widget