Vitthal Mandir Pandharpur : पंढरीचा विठुराया तिरंग्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट
करोडो वारकऱ्यांचं (Warkari) श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचं मंदिर (Vitthal Mandir) देखील तिरंग्यानं सजलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीन रंगांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
Independence Day Vitthal Mandir Pandharpur : आज देशभर स्वातंत्र्य दिनाचा (Independence Day) जल्लोष साजरा होताना दिसत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. आशताच आज करोडो वारकऱ्यांचं (Warkari) श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचं मंदिर (Vitthal Mandir) देखील तिरंग्यानं सजलं आहे. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात तीन रंगांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
मंदिराला तीन रंगाची सजावट
आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिरास तीन रंगांच्या फुलांची आकर्षक आरास केली आहे. विठुराया देखील या स्वातंत्र्याच्या रंगात रंगून गेला आहे. आज विठ्ठल मंदिराला पांढऱ्या तांबड्या आणि हिरव्या रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलं आहे. विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार सोळखांबी, नामदेव महाद्वार अशा विविध ठिकाणी या तिरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी इतिहास करणार, 11व्यांदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करणार
स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशात मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 11व्यांदा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करून इतिहास रचणार आहेत. 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून 6000 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात राष्ट्रध्वज फडकावणार असून देशाला संबोधितही करणार आहेत. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘Developed India @2047’ ठेवण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. खरं तर, 2047 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याचा 100 वा वर्धापन दिन साजरा करेल.
स्वातंत्र्याच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्यांना श्रद्धांजली
15 ऑगस्ट 1747 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्य यशस्वी ठरलं. देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, अनेकांनी स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले. अनेकांच्या बलिदानातून स्वातंत्र्यांचा सूर्य देशात उगवला आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात ज्या थोर व्यक्ती, सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, तर अनेक ठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायले जाते. दरम्यान, स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने पुरेपूर खबरदारी देखील घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या: