(Source: ECI/ABP News/ABP Majha)
युनिकॉर्न स्टार्टअपवर आयकर विभागाचा छापा, 400 कोटींची बेनामी संपत्ती उघड
युनिकॉर्न स्टार्टअपच्या पुणे आणि ठाणे कार्यालयांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात एक कोटींहून अधिक रोकड आणि 22 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
Income Tax : आयकर विभागाने पुणे आणि ठाणे येथील युनिकॉर्न स्टार्ट-अप ग्रुपच्या कार्यालयावर छापे टाकून बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. आयकर विभागाने युनिकॉर्नच्या देशभरातील 23 कार्यालयांवर 9 मार्च रोजी छापा टाकला होता. या छाप्यात युनिकॉर्न ग्रृपने फसवी खरेदी करूनआणि मोठ्या प्रमाणात बेहिशेबी रोख रक्कम खर्च करून जमिनी खरेदी केल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बेनामी संपत्तीची रक्कम जवळपास 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
सीबीडीटीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या शेल कंपन्यांच्या खात्यांमध्ये सुमारे 1,500 कोटी रुपयांच्या बनावट नोंदी दाखविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या छाप्यात आतापर्यंत एक कोटींहून अधिक रोकड आणि 22 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत माहित दिली आहे. विभागाने जाही केलेल्या निवेदनानुसार, 9 मार्च रोजी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील युनिकॉर्नच्या 23 कार्यालयांवर छापे टाकले होते.
Income Tax Department conducted searches across 23 locations of a Pune & Thane-based unicorn start-up group engaged in the business of wholesale and retail of construction material on 9th March: Official spokesperson, CBDT
— ANI (@ANI) March 20, 2022
युनिकॉर्न ग्रृप बांधकाम साहित्याच्या घाऊक आणि किरकोळ विक्रीचा व्यवहार करत असून त्यांची वार्षीक उलाढाल 6 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. छापेमारीनंतर युनिकॉर्न समूहाच्या संचालकांची चौकशी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या अनेक जवळच्या मित्रांवर आयकर विभागाने छापे टाकले होते. विभागाच्या छाप्यांमध्ये 200 कोटींची बेनामी संपत्ती उघडकीस आली होती. जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या 35 ठिकाणांवर आयकर विभागाने छापे टाकले. विशेष म्हणजे या छाप्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे, दोन कोटींची रोकड आणि दागिने मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.
महत्वाच्या बातम्या