एक्स्प्लोर

Weather Update: राज्यात तापमानाचा पारा 30 ते 35 अंशावर, तर उत्तर भारतात पावसाची शक्यता

उत्तर भारतात नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल होणार आहे. तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढला आहे.

India Weather Update : सध्या उत्तर भारतात तापमानात वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तर भारतात नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा हवामानात बदल होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंडमध्ये पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. ज्यामुळे किमान तापमानात घट होणाार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखल किमान तापमानात वाढ होत आहे. तापमानाचा पारा 30 ते 35 अंशावर गेला आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात हळूहळू तापमानात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिवस आणि रात्रीतील तापमानात तफावत जाणवत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसात राज्यात तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

दिल्ली

राजधानी दिल्लीत सध्या लोक सूर्यप्रकाशाचा आनंद लुटताना दिसत आहेत. आज तापमानात पूर्वीच्या तुलनेत वाढ होणार असली तरी यासोबतच थंड वारेही वाहत असल्याचे दिसून येत आहे. आज ढगाळ वातावरण राहणार आहे. आज दिल्लीत कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस दिल्लीत असेच वातावरण पाहायला मिळणार आहे.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागात किमान तापमान 11 ते 15 अंशांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवस राज्यात हवामान निरभ्र असेल, मात्र थंड वारेही वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


बिहार

बिहारमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आजही ढगाळ वातावरण राहील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाटणासह अनेक शहरांचे कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 11 अंश राहण्याचा अंदाज आहे. राज्यात पुढील काही दिवस असेच वातावरण राहणार आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये तापमनात वाढ होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील जयपूर आणि जोधपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 16 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

पंजाब

पंजाबमध्ये हवामान स्वच्छ राहण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज राज्यात ढगाळ वातावरण राहील. आज कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, 26 फेब्रुवारीला राज्यातील अनेक भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

जम्मू आणि काश्मीर

जम्मू-काश्मीरच्या काश्मीर विभागात आजही पाऊस आणि बर्फवृष्टी सुरूच राहणार आहे. जम्मू विभागात आज पाऊस पडणार आहे. आज कमाल तापमान 23 अंश तर किमान तापमान 14 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. IMD ने जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये संपूर्ण आठवडा पावसाचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होऊ शकते.

उत्तराखंड

गेल्या मंगळवारी उत्तराखंडमधील उंच भागात बर्फवृष्टी झाली. त्यानंतर अनेक भागात पावसाचीही नोंद झाली. त्याचवेळी हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडू शकतो, त्यामुळे किमान तापमानात घट होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज कमाल तापमान 14 अंशांपर्यंत, तर किमान तापमान 2 अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget