एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात आठवडाभरात साडे पाच कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त; सहा महिन्यांत तिसऱ्यांदा मोठी कारवाई 

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा आणि सहा महिन्यांत व्हेल माशाची उलटी जप्त (Ambergris also known as Whale Vomit)  करण्यात आली आहे.

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा आणि सहा महिन्यांत व्हेल माशाची उलटी जप्त (Ambergris also known as Whale Vomit)  करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून आठवड्यात तब्बल साडे पाच कोटींची  व्हेल माशाची उलटी जप्त केली. पोलिसांनी सापळा रचून परीख पुलानजीक व्हेल माशांची उलटी घेऊन चाललेल्या तिघांना सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून  2 किलो 15 ग्रॅम उलटी जप्त करण्यात आली. बाजारात याची किंमत तब्बल 2 कोटी 1 लाख रुपये इतकी आहे. आठवडाभरापूर्वी कारवाई करताना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना जेरबंद करत तब्बल 3.41 कोटी रुपये किमतींची 3 किलो 413 ग्रॅम व्हेल माशाची उलटी (Ambergris also known as Whale Vomit) जप्त केली होती. 

त्यामुळे कोल्हापूर आठवडाभरात साडे पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही सहा महिन्यांत तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, काल करण्यात आलेल्या कारवाईमध्ये करण संजय टिपुगडे (वय 27, रा. राम गल्ली, कळंबा), संतोष अभिमन्यू धुरी (वय 49, सुभद्रा टावर, लिंशा हॉटेल मागे, कदमवाडी), जाफर सादिक महम्मद बाणेदार( वय 40, सुलोचना पार्क,नवीन वाशी नाका) अशी संशयितांची नावे आहेत. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिबंधित असणारी व्हेल माशाची उलटी घेऊन काहीजण शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीमधून उलटी जप्त करण्यात आली.  ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, शिवानंद कुंभार, विनायक चौगुले, प्रकाश पाटील, हरीश पाटील, संजय हुंबे, नितीन चौथे, संदीप कुंभार, शिवानंद मठपती, रफिक आवळकर यांच्यासह वनाधिकारी रमेश शंकर कांबळे व वनपाल विजय ईश्वर पाटील यांनी केली. 

व्हेल माशाची उलटी अतिशय मौल्यवान 

व्हेल माशाची उलटी केवळ बाजारात विकली जात नाही, तर ती कोणत्याही हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहे. व्हेल मासा हा पृथ्वीवरील असा जीव आहे, ज्याच्या उलटीला तरंगणारे सोने म्हणतात. व्हेल माशाच्या उलटी अॅम्बरग्रीस (Ambergris) या नावानेही ओळखली जाते. तज्ञांच्या मते, त्याला विष्ठा म्हणतात. म्हणजेच व्हेलच्या शरीरातून बाहेर पडणारा टाकाऊ पदार्थ. वास्तविक ते व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडते. व्हेल मासे समुद्रातील अनेक गोष्टी खातात. यामुळे, जेव्हा त्यांना त्या गोष्टी पचवता येत नाहीत तेव्हा ती बाहेर टाकते. अ‍ॅम्बरग्रीस हे राखाडी किंवा काळ्या रंगाचे घन असते. एकप्रकारे तो मेणापासून बनलेला दगडासारखा पदार्थ आहे.

व्हेलची उलटी महाग का?

अॅम्बरग्रीस हा सुगंधी पदार्थ असतो. तो फार दुर्मिळ असतो, सहज सापडत नाही. याचा वापर नैसर्गिक परफ्युम बनवण्यात केला जातो, हे परफ्युम किंवा अत्तरे फार महागडी असतात. व्हेल माशाची उलटी किंवा अंबरग्रीस जमवणे आणि विकणे हे बेकायदेशीर आहे. तो गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा सुद्धा होऊ शकते. लोक जर या पदार्थाच्या मागे लागले तर व्हेल माशांना त्रास देऊन पकडतील, पर्यायाने व्हेलची संख्या कमी होईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget