एक्स्प्लोर

Kolhapur Crime : कोल्हापुरात सराईत गुन्हेगाराचा भर रस्त्यात निर्घृण खून; तलवारीने सपासप 17 वार 

Kolhapur  Crime : कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराचा भररस्त्यात पाठलाग करून रविरात्री रात्री निर्घृण खून करण्यात आला. गँगवॉरमधून ही घटना झाल्याचे बोलले जात आहे.टाकाळा खणीजवळ ही घटना घडली.

Kolhapur  Crime : कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराचा भररस्त्यात पाठलाग करून रविरात्री रात्री निर्घृण खून करण्यात आला. गँगवॉरमधून ही घटना झाल्याचे बोलले जात आहे. कुमार शाहूराज गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. टाकाळा खणीजवळ ही घटना घडली. हल्लेखोरांनी 17 वार करत कुमारचा खून केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कुमार मामा त्र्यंबक गवळी यांच्याकडे आईसह राहत होता. रविवारी रात्री त्र्यंबक गवळी हे जमिनीच्या व्यवहारानिमित्त ताराराणी चौकात आले असताना कुमारही सोबत होता. याचवेळी हल्लेखोरांनी कावळा नाका परिसरातून  कुमारचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे भीतीने कुमार टेंबलाई उड्डाणपुलापलीकडे गेला. मात्र, टाकाळा येथील खणीजवळ त्याला हल्लेखोरांनी गाठत सपासप वार केले.

कुमार दिसेनासा झाल्याने मामा त्र्यंबक गवळी यांनी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते; पण तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे ते दुचाकीवरून टेंबलाई उड्डाणपुलाखाली आले. त्या ठिकाणी कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांनी दुचाकीवरूनच त्याला सीपीआरला नेत असतानाच एक रुग्णवाहिका मिळाली. सीपीआरमध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

कुमारच्या खूनाची माहिती मिळताच सीपीआर परिसर तसेच राजेंद्रनगरातही मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, मृत कुमारवर  मारामारी, खुनाचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल आहेत. बिंदू चौक सबजेलमधून बाहेर पडतानाचा त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्याने ‘किंग ऑफ कोल्हापूर’ अशा नावाचे एक इन्स्टाग्राम अकाऊंट काढले होते.

एका संशयिताला पोलिसांकडून अटक 

दरम्यान, या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अटक  केली आहे. रवी  कांबळे (रा. कनाननगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. सीपीआर परिसरात मृत कुमारचे नातेवाईक जमा आल्यानंतर त्यांनी काही जणांच्या नावांच्या उल्लेख केला होता.  मुख्य संशयित अमर मानेसह चार ते पाच जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

दीड महिन्यात दुसऱ्यांदा सराईत गुन्हेगाराचा खून 

यापूर्वी,जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करून गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 24 सप्टेंबर रोजी घडली होती. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील फरार आरोपी श्रीधर उर्फ दादू बाळकृष्ण पोवारच्या (रा. दौलत नगर, राजारामपुरी कोल्हापूर) मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
Amol Mitkari: 'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Sanjay Raut | मी कुणाचा सत्कार करावा याची परवानगी घ्यावी लागेल का?CM Devendra Fadnavis PC :साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी टोचले कानAdv Anjali Dighole On Manikrao Kokate : हस्तक्षेप याचिका दाखल करणार :अंजली दिघोळेManikrao Kokate : सत्र न्यायालयात माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Igatpuri Railway Station : इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
इगतपुरी स्थानकावर दीड तास रेल्वे थांबवली, संतप्त प्रवाशांनी थेट स्टेशन मॅनेजरचं ऑफिस गाठलं अन्...
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
राऊतांनी पवारांना सल्ला देऊ नये, त्यांच्या वयाएवढा पवारांचा राजकारणातील कार्यकाळ : आनंद परांजपे
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
गौतम अदानींचा नवीन प्लॅन, 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1.12 लाख नोकऱ्या मिळणार 
Amol Mitkari: 'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
'छावा' चित्रपटात दिग्दर्शकाने शिर्के बंधू अन् सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न केला; अमोल मिटकरींचा आरोप, म्हणाले.. 
Ambadas Danve : शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
भारत-पाकिस्तान मॅच, राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या भंगारव्यवसायिकावर पालिकेचा जेसीबी; निलेश राणेंकडून इशारा
भारत-पाकिस्तान मॅच, राष्ट्रविरोधी घोषणा देणाऱ्या भंगारव्यवसायिकावर पालिकेचा जेसीबी; निलेश राणेंकडून इशारा
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
Sushma Andhare: प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
Embed widget