शरद पवार-राज ठाकरे एकाच हॉटेलमध्ये, राजकीय चर्चांना उधाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते, तर शरद पवार माजी मंत्री भारत बोन्द्रे यांच्या नागरी सत्कारसाठी बुलडाणा येथे गेले होते.
औरंगाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये एका हॉटेलमध्ये होते. दोन्ही नेत्यांची गेल्या काही दिवसांतील वाढलेली जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये असल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते, तर शरद पवार माजी मंत्री भारत बोन्द्रे यांच्या नागरी सत्कारसाठी बुलडाणा येथे गेले होते. औरंगाबाद विमानतळावरून शरद पवार आणि राज ठाकरे मुबंईला परतणार आहेत.
यादरम्यान राज ठाकरे आणि शरद पवार एकाच हॉटेलमध्ये होते. तसेच दोन्ही नेते एकाच विमानाने मुंबईला परतणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसमोर प्रस्ताव ठेवला होता. मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध असल्याचं काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगितलं होतं. मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं निरुपमांनी स्पष्ट केलं होतं.
राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्यासाठी आग्रही - सूत्र
मनसे-राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या चर्चा होत्या, मात्र आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या चर्चांना दुजोरा दिला होता. काही दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेला युतीत सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. त्यावेळी या प्रस्तावावर काँग्रेसकडून सहमती दर्शवण्यात आली नव्हती.
संबंधित बातम्या
मनसेला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव, पण काँग्रेसचा विरोध : निरुपम
मनसेला सोबत घेऊया, राष्ट्रवादीचा काँग्रेसमोर प्रस्ताव : सूत्र