एक्स्प्लोर
कोकण रेल्वेत प्रवाशांच्या जीवाशी खेळ; बेसिनमधल्या पाण्याची बाटलीबंद विक्री
रेल्वे विकलं जाणारं बाटली बंद पाणी खरंच शुद्ध असतं का? कारण रत्नागिरी रेल्वे स्थानकात अशुद्ध पाणी बंद बाटल्यांमध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वेत प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरी स्थानकात पुढे आला आहे. कारण रत्नागिरी रेल्वे पोलिसांनी बेसीनमधील पाणी बाटलीत भरुन ते सील बंद असल्याचं सांगत प्रवाशांना विकले जात होते. हा सारा धक्कादायक प्रकार रेल्वेतील प्रवाशाने पाहिल्यानंतर त्याने याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पाणी विक्री करणाऱ्या रविंद्र व्यास याला पोलिसांनी अटक केली आहे.
रविंद्र व्यास हा मुळचा गुजरातचा रहिवासी आहे. जामनगर एक्स्प्रेसमध्ये तो पिण्याच्या पाण्याच्या बॉटल विकत होता. त्यावेळ प्रवाशांनी याबाबत तक्रार केली. दरम्यान, रविंद्र व्यासने रेल्वे पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याला आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या साऱ्या प्रकारामुळे जामनगर एक्स्प्रेस जवळपास अर्धा तास रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबून होती. सकाळी साडेदहा वाजताचा हा प्रकार आहे.
प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ
कोकण रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी होत असलेल्या खेळाबाबत हा काही पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेने यात लक्ष घालावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. झुरळ, उंदीर याचा वावर देखील कोकण रेल्वेतील डब्यांमध्ये वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये याबाबत देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. जामनगर एक्स्प्रेसमधील या साऱ्या प्रकारानंतर कोकण रेल्वे गाड्यातील बाटलीबंद पाणी सुरक्षित आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.
कशी सुचली आयडिया?
रविंद्र व्यास हा रेल्वेत पाणी विकण्याचं काम मागील अनेक दिवसांपासून करत होता. सुरुवातीला बेसिनचं पाणी बाटलीबंद पाणी म्हणून विकल्यानंतर ही बाब कुणाच्याही आली नव्हती. त्यानंतर त्याला देखील याचा मोह आवरला नाही. बेसिनचं पाणी तो 15 रुपये प्रति बाटली विकू लागला. पण, जामनगर एक्स्प्रेसमधील एका चाणाक्ष प्रवासाच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने रितसर याबाबत तक्रार केली. त्यानंतर गिरीश व्यासचा 'पाणी'नामा साऱ्यांसमोर आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement