आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक, निर्णयांची होणार अंमलबजावणी? 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा
राज्य मंत्रीमंडळाची आज महत्वाची बैठक (Meeting) होणार आहे. मंत्रालयात दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून यामध्ये महत्वाच्या निर्णयांवर (Important Decisions) चर्चा होणार आहे.
Maharashtra cabinet Meeting : राज्य मंत्रीमंडळाची आज महत्वाची बैठक (Meeting) होणार आहे. मंत्रालयात दुपारी 12 वाजता ही बैठक होणार असून यामध्ये महत्वाच्या निर्णयांवर (Important Decisions) चर्चा होणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकित जानेवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा होणार आहे. राज्यातील पीक पाणी परिस्थितीचा देखील आढावा घेतला जाणार आहे.
बैठकीत या महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. तसेच राज्यातील खराब रस्त्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांसोबत केलेल्या बैठकिचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील प्रमुख रस्त्यांची रखडलेली कामं, खराब रस्ते शहरी व प्रमुख राज्य-राष्ट्रीय मार्ग गणेशोत्सवापूर्वी तातडीने दुरुस्त करण्याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम मुंबई मंडळ विभागातील ठेकेदारांची जुनी/नवीन प्रलंबित बिलांसाठी काम बंद आंदोलन पुकारले असल्याने अनेक कामांवर याचा परिणाम जाणवू शकतो. याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकित चर्चा होण्याची शक्यता आहे. पुण्यातील डेक्कन कॉलेज व पदव्युतर संशोधन संस्था, गोखले अर्थशास्त्र/राज्यशास्त्र संस्था/टिळक महाराष्ट्र विद्यापीठ यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकिय प्रतीपूर्ती योजना अनुज्ञेय करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: