एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या 11 कोटी 20 लाख जनतेच्या आशीर्वादाने मी सुखरुप : मुख्यमंत्री

लातूर : "ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही," अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर दिली. लातूरच्या निलंग्याहून मुंबईला परत येत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दुपारी 12 च्या सुमारास उड्डाण घेतलं. पण वाऱ्याचा दाब कमी असल्याचं लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. पण यादरम्यान, हेलिकॉप्टरचा पंखा वीजेच्या खांबांच्या तारांमध्ये अडकला. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाल हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण? सुदैवाने यावेळी वीजपुरवठा खंडीत झाल्याने मोठी दुर्घटना टळली. दुर्घटनेवेळी हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्र्यांसह स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाठक, प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि दोन क्रू मेंबर हेलिकॉप्टरमध्ये होते. हे सर्व जण सुखरुप आहेत. लोकांच्या आशीर्वादामुळे सुखरुप : मुख्यमंत्री

अपघातानंतर 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की,

"मी सध्या निलंग्यातच आहे, छोटासा अपघात झाला आहे.

आम्हाला कोणाला काहीच झालेलं नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही.

डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे.

ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद

माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही."

देवेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर बोलणं : अमृता फडणवीस

मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, सर्वजण सुखरुप आहेत.

बोलणं झालं तेव्हा देवेंद्रजी रिलॅक्स होते. जेमतेम मिनिटभर संभाषण झालं.

देवेंद्रजी तूर्तास संभाजी निलंगेकरांकडे थांबले आहेत, तिथून दौरा पुढे करतील,

अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं? मुख्यमंत्र्यांनी उड्डाण केलेलं हेलिकॉप्टर हे सिरकॉस्की (sirkowski) व्हीटी या प्रकाराचं आहे. जगभरातील व्हीव्हीआयपींना हे हेलिकॉप्टर वापरलं जातं. देशात उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टरपैकी हे सर्वोत्कृष्ट आहे. हे हेलिकॉप्टर जेमतेम तीन ते चार वर्ष जुनं आहे. या हेलिकॉप्टरने एकावेळी अडीच तासांचा म्हणजे साधारणपणे 800 किलोमीटरचा प्रवास करता येतो. दोन पायलट आणि पाच प्रवासी वाहून नेण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता आहे. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला कुशल पायलट महाराष्ट्र सरकारचे अनुभवी क्रू हेलिकॉप्टर उडवतात. टेक्निकल इमर्जन्सी हँडल करण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं असतं. किमान तीन हजार तास उड्डाणाचा अनुभव असलेले पायलट यासाठी नियुक्त केले जातात. कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना अशी हेलिकॉप्टर आणि पायलट दिले जातात. नागरी हवाई उड्डाण संचालनालयची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता उड्डाण केलं. पण वाऱ्याचा बदलता दाब लक्षात आल्याने वैमानिकाने लॅण्डिंग करण्याचं ठरवलं. या दरम्यान, हेलिकॉप्टर वीजेच्या तारांमध्ये अडकलं. यामुळे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झाला. चॉपरमधील सर्व सहा जण सुखरुप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण संचालनालयाने दिली. मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

संबंधित बातम्या :

PHOTO : देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget