एक्स्प्लोर

Battlegrounds Mobile India : गेमचे बीटा व्हर्जन उपलब्ध , केवळ 'याच' लोकांना खेळता येणार

लॉन्चिंगच्या आधीच Battlegrounds Mobile India या गेमचे बीटा व्हर्जन (Beta Version) प्ले स्टोअरवर उपलब्ध करुन देण्यात आलं असून त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. 

मुंबई : पबजीचे भारतीय व्हर्जन असणाऱ्या Battlegrounds Mobile India या गेमची आतुरता अनेकांना लागली आहे. त्याचं लॉन्चिंग लवकरच करण्यात येणार आहे अशी माहिती आहे. पण लॉन्चिंगच्या आधीच भारतात डाऊनलोडिंगसाठी हा गेम उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या गेमचा बीटा व्हर्जन आता टेस्टिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पण मर्यादित संख्येनेच यूजर्संना गुगल प्ले स्टोअरवरुन या गेमचे डाऊनलोड करता येऊ शकेल. बीटा व्हर्जननंतर आता या गेमचे लॉन्चिंग लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे. 

मर्यादित यूजर्सना फायदा
बिटा व्हर्जनच्या टेस्टिंगचा फायदा हा काहीच यूजर्सना मिळणार आहे. सध्या गुगल प्ले स्टोअरच्या नियमानुसार बीटा व्हर्जनच्या यूजर्सची संख्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता  Battlegrounds Mobile India गेमच्या बीटा टेस्टिंगने रिक्वेस्ट बंद केली आहे. याचा अर्थ सर्वसामान्यांना अद्याप या गेमचा आनंद घेता येणार नाही. 

गेम खेळण्यासाठी खालील नियम असतील.

  • Battlegrounds Mobile India गेमला OTP च्या माध्यमातून लॉग-इन करता येऊ शकेल.
  • OTP व्हेरिफिकेशननंतर हा गेम खेळता येऊ शकेल.
  • प्लेअर्स व्हेरिफाईड कोडला तीन वेळा वापरु शकतात, त्यानंतर हा कोड इनव्हॅलिड होईल. 
  • एक व्हेरिफिकेशन कोड केवळ पाच मिनीटांसाठीच असेल, त्यानंतर तो एक्सपायर होईल.
  • लॉग-इनसाठी प्लेअर्स फक्त 10 वेळा  OTP रिक्वेस्ट टाकू शकतील.
  • प्लेअर एका मोबाईल नंबरवरुन जास्तीत जास्त 10 अकाऊंटवर रजिस्टर करु शकेल. 

पबजी चं भारतीय व्हर्जन असणारा Battlegrounds Mobile India या गेमची निर्मिती दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी Krafton कडून करण्यात आली आहे. याचे लॉन्चिंग जूनमध्ये होणार असून, यासाठी प्री रजिस्टर करणाऱ्यांना खास रिवॉर्डही मिळणार असल्याचं क्राफ्टनकडून या आधी जाहीर करण्यात आलं होतं.

गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुलांसाठी नियम काही अंशी कठोर ठेवण्यात आले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्यासाठी त्यांना पालकांचा दुरध्वनी क्रमांकही द्यावा लागणार आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
Instagram Ban In India Fact Check: मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
मोदी सरकार 25 ऑगस्टपासून इन्स्टाग्राम बंद करणार? व्हायरल पोस्टने खळबळ, सरकारची मोठी अपडेट
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget